PM Narendra Modi in G20 Virtual Summit 2023 Saam Tv
देश विदेश

G20 Virtual Summit 2023: जी 20 वर्च्युअल समिटमध्ये PM मोदींनी उपस्थित केला Deepfake चा मुद्दा, काय म्हणाले जाणून घ्या...

G20 Virtual Summit 2023 मध्ये PM मोदींनी उपस्थित केला Deepfake चा मुद्दा, काय म्हणाले जाणून घ्या...

Satish Kengar

PM Narendra Modi in G20 Virtual Summit 2023:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी जी 20 शिखर परिषदेच्या 2023 च्या वर्च्युअल समिटला संबोधित केले. यावेळी त्यांनी डीपफेक, पश्चिम आशियातील अस्थिरता आणि ग्लोबल साउथ या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले मत मांडले.

त्यांनी डीपफेक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) समाजासाठी विष असल्याचं म्हंटलं आहे. ते म्हणाले आहेत की, आम्हाला यावर आणखी काम करावे लागेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सामाजिक सुरक्षिततेच्या भावनेने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.

जी-20 वर्च्युअल शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज जगात विविध आव्हाने आहेत आणि त्यांच्याशी लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी हा आमचा परस्पर विश्वास आहे, जो आम्हाला एकमेकांशी जोडून ठेवतो. ग्लोबल साउथचे देश स्वत:चा कोणताही दोष नसताना अनेक अडचणींना तोंड देत आहेत. 21व्या शतकातील जगाला या चिंतांना प्राधान्य द्यावे लागेल. विकासाच्या अजेंड्याला आपला पूर्ण पाठिंबा देणे ही काळाची गरज आहे. ते म्हणाले, 'जेव्हा मी या व्हर्च्युअल समिटचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा मला आज जागतिक परिस्थिती कशी असेल याचा अंदाज नव्हता.' (Latest Marathi News)

‘दहशतवाद कोणालाही मान्य नाही’

दहशतवाद आपल्यापैकी कोणालाच मान्य नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पश्चिम आशियामध्ये उद्भवणारी असुरक्षितता आणि अस्थिरता ही आपल्या सर्वांसाठी मोठी चिंतेची बाब आहे. या समस्या सोडवण्यासाठी आपण एकमेकांच्या पाठीशी उभे आहोत, हे आज एका व्यासपीठावर एकत्र येणे हे सिद्ध करते. अतिरेकी संघटना हमास आणि इस्रायल सरकार यांच्यातील युद्धाला क्षेत्रीय स्वरूप धारण करू नये, याची काळजी घ्यावी लागेल. यासोबतच हे युद्ध संपल्याच्या आणि ओलीसांची सुटका झाल्याच्या वृत्तावर त्यांनी समाधान व्यक्त केला.

या परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर म्हणाले की, जगभरात याच्या गैरवापराबाबतची चिंता व्यक्त केली जात आहे. यावर भारताची भूमिका स्पष्ट आहे की, जागतिक स्तरावर यासाठी आपण नियमन करण्याच्या दिशेने काम केले पाहिजे. हे समाजासाठी सुरक्षित बनवणे आणि ते जनतेसाठी सुलभ बनवणे, ही एक महत्त्वाची बाब आहे. पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या प्रस्तावित ग्लोबल एआय पार्टनरशिप समिटचा संदर्भ देत, सर्व देश त्यात आवश्यक ते सहकार्य करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

Skip Lunch Effect: जेवण टाळणं म्हणजे आजारांना निमंत्रण? जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT