Google Pay युजर्स सावधान! चुकूनही Download करू नका हे Apps, नाही तर बँक खातं होईल रिकामं

Google Pay Users Beware: Google Pay युजर्स सावधान! चुकूनही Download करू नका हे Apps, नाही तर बँक खातं होईल रिकामं
Google Pay Users Beware
Google Pay Users BewareSaam Tv
Published On

Google Pay Users Alert :

Google Pay हे देशातील सर्वात लोकप्रिय UPI पेमेंट अॅप्सपैकी एक आहे. हे अॅप भारतातील सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या टॉप 5 UPI अॅप्सपैकी एक आहे. तुम्हीही गुगल पे अॅप वापरत असाल तर ही बातमी वाचणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण गुगलनेच आपल्या युजर्ससाठी काही अलर्ट जारी केले आहेत.

गुगलचं म्हणणं आहे की, कंपनी संशयास्पद व्यवहार ओळखण्यासाठी सर्वोत्तम कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आणि फसवणूक प्रतिबंधक तंत्रांचा वापर करते. कंपनी आपले काम करत असली तरी, परंतु युजर्सनी सावधगिरी बाळगणे देखील महत्त्वाचे आहे. Google ने आपल्या वेबसाइटवर Google Pay युजर्ससाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Google Pay Users Beware
Electric Bike: मुंबईहून पुणे एका चार्जमध्ये गाठणार, लॉन्च झाली 'ही' जबरदस्त इलेक्ट्रिक बाईक; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

तुम्ही Google Pay वापरत असल्यास 'या' गोष्टी लक्षात ठेवा

तुम्ही Google Pay वापरत असल्यास, सर्व स्क्रीन शेअरिंग अॅप्स बंद करा. व्यवहार करताना स्क्रीन शेअरिंग अॅप्स कधीही वापरू नका.  (Latest Marathi News)

स्क्रीन शेअरिंग अॅप्स काय आहेत?

स्क्रीन शेअरिंग अॅप्स इतर लोकांना तुमच्या डिव्हाइसच्या स्क्रीनवर काय सुरू आहे, हे पाहण्याची परवानगी देतात. तुम्ही फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटर वापरत असलात तरीही, याच्याद्वारे एखादी व्यक्ती तुमच्या डिव्हाइसवर काय सुरू आहे, हे पाहू शकतो. स्क्रीन शेअरिंग अॅप्सची उदाहरणे म्हणजे स्क्रीन शेअर, AnyDesk आणि TeamViewer.

Google Pay Users Beware
Bajaj Upcoming Bike: पुण्यात स्पॉट झाली बजाजची नवीन बाईक, पल्सरपेक्षाही कमी असेल किंमत? जाणून घ्या फीचर्स...

Google Pay सह स्क्रीन शेअरिंग अॅप्स का वापरू नयेत?

Google Pay युजर्सने स्क्रीन शेअरिंग अॅप्स का वापरू नयेत, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर याचे कारण म्हणजे फसवणूक करणारे देखील हे अॅप वापरू शकतात. फसवणूक करणारे स्क्रीन शेअरिंग अॅप्सद्वारे तुमचे वैयक्तिक तपशील चोरतात. जसे की एटीएम किंवा डेबिट कार्ड तपशील. फसवणूक करणार्‍यांसाठी तुमच्या फोनवर पाठवलेला OTP पाहणे आणि ते तुमच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरणे खूप सोपे झाले आहे, त्यामुळे तुमचे खाते रिकामी होऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com