Bajaj Upcoming Bike: पुण्यात स्पॉट झाली बजाजची नवीन बाईक, पल्सरपेक्षाही कमी असेल किंमत? जाणून घ्या फीचर्स...

Bajaj New Bike Spot in Pune: पुण्यात स्पॉट झाली बजाजची नवीन बाईक, पल्सरपेक्षाही कमी असेल किंमत? जाणून घ्या फीचर्स...
Bajaj Upcoming Bike Spot in Pune
Bajaj Upcoming Bike Spot in PuneSaam Tv
Published On

Bajaj Upcoming Bike Spot in Pune:

टू-व्हीलर कंपनी बजाज आपल्या पोर्टफोलिओमध्ये नवीन बाईक समावेश करण्याचा विचार करत आहे. नुकतीच कंपनीची नवीन बाईक पुण्यात टेस्टिंग दरम्यान दिसली आहे.

जर आपण स्पॉट मॉडेलचा विचार केला तर, याची डिझाइन सध्याच्या बजाज CT125X सारखी दिसते. ज्यामुळे ते CT150X असण्याची शक्यता आहे. बाईकमध्ये गोल हेडलाइटच्या दोन्ही बाजूला मोठे बल्ब टर्न इंडिकेटर आहेत. ही बाईक दिसायला खूपच आकर्षक आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bajaj Upcoming Bike Spot in Pune
Vivo New Smartphone: 50MP Sony IMX989 पॉवरफुल कॅमेरा, 5400mAh बॅटरी; Vivo X100 सिरीजचे दोन नवीन फोन लॉन्च

बजाजच्या या आगामी CT150X ला सिंगल-पीस सीट, इंजिन क्रॅश गार्ड आणि इंटिग्रेटेड फूट रेस्ट मिळेल. यामध्ये लेटेस्ट बाईकचे व्हील डिझाईन सध्याच्या मॉडेलपेक्षा वेगळे आहे. त्याच्या फ्रंट डिस्कचा आकार आणि शेप CT125X प्रमाणेच आहे. याशिवाय, कंपनीने या बाईकला मजबूत डिझाइन देण्यासाठी हँडलबार आणि जाड फूटपेग्स सारखे इतर एलिमेंट देखील जोडले आहेत. यात ABS सोबत अनेक कनेक्टिव्हिटी फीचर्स असण्याचीही अपेक्षा आहे.  (Latest Marathi News)

बजाजची ही बाईक 150cc पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केली जाईल. या पोर्टफोलिओमध्ये आधीच Pulsar 150 आणि Pulsar N150 सारखे मॉडेल समाविष्ट आहेत. ही बाईक आपल्या सेगमेंटमध्ये ग्रामीण आणि शहरी ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करेल, असं बोललं जात आहे.

Bajaj Upcoming Bike Spot in Pune
Volvo XC40 Petrol: भारतात Volvo XC40 पेट्रोल मॉडेलची विक्री बंद, काय आहे कारण?

यात एअर कूल्ड इंजिन मिळण्याची अपेक्षित आहे. ही बाईक पुढील वर्षी लॉन्च केली जाऊ शकते. या बाईकच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, ती बजाज पल्सर 150 पेक्षा कमी असेल. ज्याची एक्स-शोरूम किंमत 1.04 लाख रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com