Vivo New Smartphone: 50MP Sony IMX989 पॉवरफुल कॅमेरा, 5400mAh बॅटरी; Vivo X100 सिरीजचे दोन नवीन फोन लॉन्च

Vivo New Launch Smartphone: 50MP Sony IMX989 पॉवरफुल कॅमेरा, 5400mAh बॅटरी; Vivo X100 सिरीजचे दोन नवीन फोन लॉन्च
Vivo New Launch Smartphone
Vivo New Launch SmartphoneSaam Tv
Published On

Vivo New Launch Smartphone

प्रसिद्ध चीनी मोबाईल उत्पादक Vivo ने नवीन Vivo X100 लाइनअप सादर केली आहे. यात दोन नवीन फोन समाविष्ट करण्यात आले आहेत. ज्यात Vivo X100 आणि Vivo X100 Pro चा समावेश आहे.

कव्हर्ड डिस्प्ले व्यतिरिक्त, या फोनमध्ये Android 14 वर आधारित OriginOS 4 देखील आहे. याशिवाय, यात 120W पर्यंत फास्ट चार्जिंगसह मोठी बॅटरी देण्यात आली आहे. याचीच किंमत आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vivo New Launch Smartphone
Honda Livo: 60 Kmpl चा जबरदस्त मायलेज; किंमत 80 हजारपेक्षा कमी; जाणून घ्या कशी आहे Honda ची 'ही' स्मार्ट बाईक

Vivo X100 Pro स्पेसिफिकेशन

या प्रीमियम स्मार्टफोनमध्ये Android 14 वर आधारित OriginOS 4 आहे. यात 6.78 इंच AMOLED 8T LTPO कव्हर्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 3000nits पर्यंत पीक ब्राइटनेस देतो. MediaTek Dimensity प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये 16GB पर्यंत LPDDR5 RAM आणि G720 GPU आहे. हा फोन IP68 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स रेटिंगसह येतो. (Latest Marathi News)

कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, X100 Pro च्या मागील पॅनलवर OIS सपोर्टसह Zeiss ब्रँडिंग 50MP Sony IMX989 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, सेटअपमध्ये 50MP वाइड-एंगल कॅमेरा आणि 4.3x ऑप्टिकल झूम आणि OIS सह 50MP Zeiss APO सुपर टेलिफोटो कॅमेरा आहे. यात 32MP सेल्फी कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5400mAh बॅटरी 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येते.

Vivo New Launch Smartphone
OnePlus चा 108MP 5G स्मार्टफोन फक्त 1,099 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी? जाणून घ्या काय ऑफर

Vivo X100 स्पेसिफिकेशन

व्हॅनिला मॉडेलचे डिस्प्ले, सॉफ्टवेअर आणि आयपी रेटिंग संबंधित फीचर्स मागील प्रो डिव्हाइस प्रमाणेच आहेत. यात 16GB LPDDR5 RAM G720 GPU सह MedoiaTek Dimensity 9300 प्रोसेसर आहे. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देखील आहे. यात 50MP Sony IMX920 VCS बायोनिक प्रायमरी कॅमेरा सोबत 50MP अल्ट्रा-वाइड-एंगल आणि 100x क्लिअर झूमसह 64MP Zeiss सुपर-टेलिफोटो कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी 120W चार्जिंग सपोर्टसह येते.

Vivo X100 आणि Vivo X100 Pro ची किंमत

नवीन Vivo X100 Pro ची प्रारंभिक किंमत 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हॅरिएंटसाठी 4,999 युआन (सुमारे 56,500 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर व्हॅनिला Vivo X100 ची किंमत त्याच प्रकारासाठी 3,999 युआन (सुमारे 50,000 रुपये) पासून सुरू होते. याशिवाय, LPDDR5T लिमिटेड एडिशन 16GB रॅम आणि 1TB स्टोरेज व्हॅरिएंटची किंमत 5,099 युआन (सुमारे 58,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन सध्या चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. भारतात याच्या लॉन्चशी संबंधित माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com