इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच अनेक नवीन कंपनीही आपले इलेक्ट्रिक वाहन बाजारात उतरवत आहेत. यातच आता वाहन उत्पादक कंपनी Orxa Mantis ने आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे.
ही स्पोर्ट्स लूक हायस्पीड बाईक आहे. या बाईकला 8.9 kWh चा बॅटरी सेटअप मिळेल. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही बाईक 221 किमी पर्यंत धावेल. मिळालेल्या माहितीनुसार, ही बाईक 3.6 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध असेल. सध्या ही बाईक फक्त सिंगल व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Orxa Mantis मध्ये 1.3kW आणि 20.5kW सॉकेटमधून चार्ज करण्याचा पर्याय असेल. ही बाईक 93 Nm टॉर्क जनरेट करेल. यात लिक्विड कूल्ड मोटर ग्राहकांना मिळेल. जी लांबचा प्रवास करताना लवकर तापत नाही. ही बाईक बाजारात अल्ट्राव्हायोलेट F77 ला टक्कर देईल. या बाईकला 28 hp ची पॉवर मिळेल. बाईकच्या पुढील भागाला अतिशय आक्रमक लूक देण्यात आला आहे. Orxa Mantis इलेक्ट्रिक बाईकचा टॉप स्पीड 135 kmph असेल. ही बाईक फक्त 8.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडते. (Latest Marathi News)
डिलिव्हरी एप्रिल 2024 मध्ये होणार सुरू
Orxa Mantis चे वजन 182 kg आहे, ज्यामुळे रस्त्यावर ही बाईक स्पीडमध्ये असतानाही नियंत्रण करणे सोपे होते. याच्या बाजूच्या पॅनियरमध्ये 30 लीटर आणि वरच्या बॉक्समध्ये 45 लीटर सामान ठेवण्याची जागा आहे. कंपनी एप्रिल 2024 मध्ये त्याची डिलिव्हरी सुरू करेल. याचे उत्पादन सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
याची डिलिव्हरी आधी बेंगळुरूपासून सुरू होईल, त्यानंतर कंपनी इतर शहरांमध्ये डिलिव्हरी करेल. तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर 10,000 रुपयांच्या टोकन रक्कमेसह बाईक बुक करू शकता. सुरुवातीच्या 1000 ग्राहकांनंतर कंपनी 25000 रुपयांमध्ये बुकिंग घेईल, असं सांगितलं जात आहे.
एका चार्जवर 307 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज
याची स्पर्धक बाईक Ultraviolette F77 बद्दल बोलायचे झाले तर, ही बाईक 152 किमी/तास चा टॉप स्पीड देते. ही बाईक 3.80 लाख रुपयांच्या एक्स-शोरूमच्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध आहे. बाईकमध्ये 30200 पॉवरची मोटर आहे. ही 7.8 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडते. बाईकमध्ये चार रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत. ही एका चार्जवर 307 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. या बाईकचे वजन 207 किलो आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.