EV Bike : e-Sprintoची स्कूटर पेट्रोल न भरता गाठते १०० किमीचा टप्पा; फिचर्स वाचून तुम्हीही म्हणाल 'जस्ट Wow'

e-Sprinto Scooter: कंपनीने दोन इलेक्ट्रिक बाईक बाजारात लॉन्च करत त्यांच्या किमती जाहीर केल्या आहेत.
e-Sprinto Scooter
e-Sprinto Scooterbike dekho
Published On

E-Sprinto Roamy And Ropo Electric Scooter:

भारतातील दुचाकी निर्माण करणारी e-Sprinto कंपनीने देशातील बाजारात आपल्या दोन बाईक आणल्या आहेत. कंपनीने Rapo आणि Roamy नावाच्या इलेक्ट्रि स्कूटर बाजारात लॉन्च केल्या आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटर इतर बाईकपेक्षा सरस आहेत, शिवाय प्रत्येकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये या स्कूटर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (Latest News)

कंपनीने दोन इलेक्ट्रिक बाईक बाजारात लॉन्च करत त्यांच्या किमतीदेखील जाहीर केल्या आहेत. Rapo या बाईकची किमत ६२ हजार९९९ रुपये आहे. तर e-Sprinto Roamy या बाईकची किमत (एक्स शोरूम) ५४ हजार ९९९ रुपये असणार आहे. कोणताही ग्राहक आपल्या गरजेनुसार या बाईकाचा वापर करू शकतो. म्हणजेच जर तुम्ही गावात राहत असाल तेथे डांबरी रस्ता नसेल तेथेही या स्कूटर शानदार पद्धतीने धावतील, असा दावा कंपनीकडून करण्यात आलाय. ग्राहकांची आवड लक्षात घेत या दोन्ही स्कूटरचं डिझाइन करण्यात आलंय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहे रेंज आणि डिटेल्स

ई- स्प्रिंटो रोपो आणि रोमी या दोन्ही ईलेक्ट्रिक बाईक पारंपारिक डिजाइनमध्ये तयार करण्यात आल्या आहेत. रोपो बाईकमध्ये १७० मीमीचं ग्राउंड क्लिअरन्स आहे. यामुळे ही बाईक कसाही रस्ता असला तरी आरामदायी प्रवास घडवते. म्हणजेच अगदी ओबड-धोबड रस्ता असला तरी त्यावर धावण्यास ही बाईक सक्षम आहे.

ही बाईक लिथिअम- आर्यन आणि लेड-अॅसिड बॅटरीच्या दोन्ही पर्यायात उपलब्ध आहे. या ईलेक्ट्रिक स्कूटरमध्ये पावर देणारा आयपी ६५ रेटेड २५० व्हॅट BLDC हब मोटर आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा चार्ज केली तर १०० किलोमीटरपर्यंतचं अव्हरेंज देते.

e-Sprinto Rapo

रोपो स्कूटरला टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि रिअरमध्ये थ्री-स्टेप एडजस्टेबल कॉइल स्प्रिंग सस्पेंशन देण्यात आलंय. तसेच फ्रंट डिस्क ब्रेक आणि मागील चाकासाठी ड्रम यूनिट देण्यात आलंय. या रोपो स्कूटरचे पुढील १२ इंच (व्हिल ) आहे आणि मागील व्हील हे १० इंच आहे.

e-Sprinto Roamy

ई-स्प्रिंटो रोमी स्कूटरचंही रोपो स्कूटरप्रमाणे ग्राउंड क्लिअरन्स आहे. ही स्कूटर पण लिथिअम-आर्यन आणि लेड अॅसिड बॅटरी या दोन्ही पर्यायात उपलब्ध आहे. या स्कूटरला पावर देणारी IP65 रेटेड २५० व्हॅट मोटार आहे. ही बाईक प्रति तास २५ किमीचं स्पीड घेत असते. या ईलेक्ट्रिक स्कूटरचं सस्पेंशन आणि ब्रेक रोपो स्कूटरप्रमाणे आहेत.

दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रिमोट लॉक आणि अनलॉक, रिमोट स्टार्ट, युएसबी मोबाईल चार्जिंग आणि इंधन किती आहेत हे जाणून घेण्यासाठी एक डिस्प्ले आहे. रोपो लाल, निळ्या, ग्रे, काळ्या, आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे. तर रोमी स्कूटर लाल, निळा, ग्रे, काळा आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे.

e-Sprinto Scooter
Hyundai 2025 पर्यंत करणार 700 कोटींचा बॅटरी प्लांट, EV ला मिळणार मोठा बूस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com