इलेक्ट्रिक स्कूटर्सची सध्या भारतीय बाजारात खूप मागणी वाढली आहे. यातच लोकांना ज्यांची ड्रायव्हिंग रेंज 100 किलोमीटरपेक्षा जास्त असते, अशा इलेक्ट्रिक स्कूटर जास्त आवडतात. सुरक्षेसाठी या स्कूटरमध्ये डिस्क ब्रेक दिले जातात. या नवीन जनरेशन फ्युचरिस्टिक स्कूटर आहेत. यामध्ये डिजिटल डिस्प्लेसह आरामदायी प्रवासासाठी हेवी सस्पेंशन ग्राहकांना मिळतं. अशाच काही स्कूटरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
Ola S1 Pro
या स्कूटरची किंमत 1.47 लाख रुपये आहे. ही स्कूटर एका चार्जवर 181 किमी रेंज देते. यात 12 रंगांचे पर्याय आहेत. स्कूटरमध्ये एलईडी लाइट, 7 इंच टच स्क्रीन टीएफटी डिस्प्ले आहे. स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि वायफाय सारखे फीचर्स आहेत. यात साइड-स्टँड डाउन, अँटी-थेफ्ट अलर्ट, जिओ-फेन्सिंग आणि रिव्हर्स मोड आहे. स्कूटरमध्ये 5.5 kW आणि 8.5 kW क्षमतेचा बॅटरी पॅक आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Ather 450X
या जबरदस्त EV स्कूटरमध्ये 3.7 kWh बॅटरी आहे. यात 7-इंचाचा टचस्क्रीन कन्सोल आहे. यात स्मार्टइको, इको, राइड, स्पोर्ट आणि Warp असे पाच मोड आहेत. या स्कूटरची किंमत 98079 हजार रुपये आहे. ही स्कूटर साडेचार तासांत चार्ज होते. याची रेंज 150 किमी आहे. (Latest Marathi News)
Hero Electric Optima
हीरो स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 135 किमी पर्यंत धावते. स्कूटरचे एकूण वजन 102 किलो आहे. स्कूटर रस्त्यावर 55 किमी/तासचा टॉप स्पीड देते. स्कूटरमध्ये 1200 पॉवरची मोटर आहे. यामध्ये दोन व्हेरियंट ऑफर केले जात आहेत. ही स्कूटर 67190 हजार रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे.
BattRE Electric Storie
या EV स्कूटरची प्रारंभिक किंमत 89600 हजार रुपये आहे. ही स्कूटर 3.1 kWh बॅटरी पॅकमध्ये उपलब्ध आहे. यात इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल अलर्ट आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सारखी फीचर्स आहेत. ही स्कूटर एका चार्जवर 132 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. यात 3.1 क्षमतेचा बॅटरी पॅक आहे. या पॉवरफुल स्कूटरमध्ये पुढील आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. यात ट्यूबलेस टायर आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.