राज्यातील काही भागात थंडीचा गारवा जाणवू लागला आहे. हिवाळा हा ऋतू प्रत्येकाला आवडतो. या काळात आरोग्यासोबत आपल्याला वाहनांची देखील काळजी घ्यावी लागते.
हिवाळ्यात दुचाकी चालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या काळात थंडी, धुकं आणि धुरकं यांचा देखील सामना करावा लागतो. तापमानात घट झाल्यावर बाइक-स्कूटीवरुन प्रवास करणे खरेतर कठीण होते. त्यामुळे हिवाळ्यात आपल्या वाहनांची काळजी कशी घ्यायची हे जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
1. स्कूटरची काळजी घ्या
हिवाळ्यात स्कूटरने प्रवास करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जर स्कूटरची योग्य प्रकारे काळजी घेतली तर रायडरच्या सुरक्षिततेची तसेच त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्यापासून संरक्षण करेल.
2. बॅटरी महत्त्वाची
स्कूटरमध्ये देखील बॅटरी दिली जाते. हिवाळ्यात स्कूटर उघड्यावर पार्क केली जाते. ज्यामुळे त्याचा परिणाम बॅटरीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यासाठी नियमितपणे बॅटरी तपासा. तसेच बॅटरी बदलण्याची गरज असेल तर बदला.
4. हेडलाइट्सही महत्त्वाची
हिवाळ्यात (Winter Season) स्कूटी चालवायची असेल तर त्याच्या सुरक्षिततेसाठी हेडलाइट्स तपासणे आवश्यक आहे. हिवाळ्यात सकाळच्यावेळी घराबाहेर जात असाल तर हेडलाइट्स चेक करा. ज्यामुळे अपघाताचा धोका टळेल.
5. वाहनांचा वेग
कडाक्याच्या थंडीत तुम्ही स्कूटी- बाइकवरुन प्रवास करत असाल तर त्याचा वेग कमी ठेवा. ज्यामुळे तुम्हाला कमी थंडी लागेल. तसेच अचानक ब्रेक लावण्याच्या वेळी तुम्ही बाइक नीट कंट्रोल करु शकाल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.