Hyundai 2025 पर्यंत करणार 700 कोटींचा बॅटरी प्लांट, EV ला मिळणार मोठा बूस्ट

EV Production : हुंडई मोटर इंडिया दक्षिण कोरियीन कार निर्माते आहे. भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी करण्यासाठी बॅटरी पॅकच्या इंस्टॉलेशनला मोठा भर दिला आहे.
Battery Pack Installation
Battery Pack InstallationSaam Tv
Published On

Battery Pack Installation In India :

हुंडई मोटर इंडिया दक्षिण कोरियीन कार निर्माते आहे. भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी करण्यासाठी बॅटरी पॅकच्या इंस्टॉलेशनला मोठा भर दिला आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, EVs देशात 2 %पेक्षा कमी विकल्या जात आहेत, त्यासाठी एक मोठा निर्णय घेण्याचा विचार मांडला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या बॅटरी पॅकच्या इंस्टॉलेशननंतर इलेक्ट्रीक कार जास्त विकल्या जातील असे कंपनीच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. या सोबतच भारतात बॅटरी पॅकच्या इंस्टॉलेशन केल्याने भारत सरकारलाही मोठा फायदा (Benefits) होईल.

बॅटरी पॅकच्या इंस्टॉलेशननंतर हुंडई मोटरसाठी देशात मोठं वळण पाहताना मिळेल. कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, असे केल्याने भारतातील लोक 15 % इलेक्ट्रिक व्हेइकल विकत घेण्यावर भर देतील.

Battery Pack Installation
7 Seater Cars: मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे 'ही' कार, मिळत आहे मोठी सूट; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

ह्युंडई मोटर इंडियाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी एका वृत्तपत्राला सांगतात की, बॅटरी असेंबली प्लॅन्टमध्ये, 2025 पर्यंत पहिल्या टप्प्यात 75,000 बॅटरी पॅक्स्सांची क्षमता असेल. याची किंमत कोट्यावधिंच्या घरात आहे.

भारतातील सध्या ईलेक्ट्रीक (Electric) वाहनांची फार क्रेझ दिसत नाहीये. त्याबाबत ह्युदांई कार निर्मात्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनसू किम यांनी जगातील ईलेक्ट्रीक वाहनांची सध्याची परिस्थिती सांगितली आहे.

Battery Pack Installation
Car Care Tips : पेट्रोल कारमध्ये CNG किट फिट करताय? या गोष्टी नक्की लक्षात ठेवा, अन्यथा...

जगात ईलेक्ट्रीक वाहनांची क्रेझ सध्या पाहायला मिळत नाहीये. युक्रेन- रशिया युद्ध हे यामागील मोठे कारण आहे. युरोपीय देशांना कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी करायचे आहे. परंतु युद्धामुळे हे शक्य होत नाही. असे ते म्हणाले. या सोबतच टाटा आणि महिन्द्रासोबत इतरही कार उत्पादकांनी असा निर्णय घेण्याचा विचार केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com