Benefits Of Cardamoms : झोपण्यापूर्वी फक्त दोन वेलची खाल्ल्याने सकाळी जाणवेल हा फायदा, वाचा सविस्तर

Cardamoms Benefits To Health : वेलची एक सुगंधीत मसाला आहे. गोड पदार्थांची चव वाढवण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो.
Benefits Of Cardamoms
Benefits Of Cardamoms Saam Tv
Published On

Health Tips :

वेलची एक सुगंधीत मसाला आहे. गोड पदार्थांची चव वाढवण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो. वेलचीचा वापर माउथ फ्रेशनरच्या रुपात देखील केला जाऊ शकतो. यामध्ये आयरन आणि रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन सी आणि नियासिन देखील असते. हे रेड ब्लड सेल्स निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. वेलची खाण्याचे अनेक फायदे (Benefits) आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पचनक्रिया सुरळीत करते

जेवणानंतर अनेक लोक वेलचीचा वापर माउथ फ्रेशनरच्या रुपात करतात. कारण, वेलची नैसर्गिकरित्या गॅसला नष्ट करण्याचे काम करते. वेलची पचनशक्ती वाढवण्यात, पोटाची सूज कमी करण्यात आणि छातीतील जळजळ संपवण्याचे काम (Work) करते. आयुर्वेदिक ग्रंथांप्रमाणे वेलची पचनक्रियेत मदत करते. जर तुम्हाला अपचनाची समस्या आहे तर रात्री दोन वेलची, अद्रकचा छोटा तुकडा, थोडीशी लवंग आणि धने बारीक करा. हे पावडर गरम पाण्यासोबत घ्या. पोटासंबंधीत सर्व समस्या दूर होतील.

Benefits Of Cardamoms
Benefits Of Betel Nut: पूजेत सुपारीला का आहे विशेष महत्व?

श्वासाची दुर्गंधी दूर होते

वेलचीअँटी-बॅक्टेरियल गुण असतात. यासोबतच वेलचीची तिखट चव आणि सुगंध, श्वासांची दुर्गंधी दूर करते. ही डायजेस्टिव्ह सिस्टीमला मजबूत करते. रोज जेवण केल्यानंतर एक वेलची खा किंवा रोज सकाळी वेलचीचा चहा प्या.

ॲसिडिटीपासुन आराम

वेलचीमध्ये उपलब्ध असलेले तेल ॲसिडिटीला नष्ट करते. वेलची चावल्यानंतर त्यामधून अनेक प्रकारचे तेल बाहेर पडतात. जे तुमच्या लाळ ग्रंथींना उत्तेजित करतात. यामुळे तुमचे पोट चांगल्या प्रकारे कार्य करते. वेलची खाल्लावर त्यामधील तेल गारवा देते. यामुळेच वेलची चावल्यावर होणारी ॲसिडिटीची जळजळ दूर होते.

Benefits Of Cardamoms
Benefits of Soaked Peanuts: भिजवलेले शेंगदाणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

फुफूसांसंबंधीत आजारांचा नैसर्गिक इलाज

वेलची दमा, खोकला, सर्दी आणि फुफूसांसंबंधीत आजारांपासुन आराम देते. आयुर्वेदात इलायचीला एक गरम मसाला मानले जाते. ही शरीराला आतुन गरम ठेवते. वेलचीचे सेवन केल्याने कफ बाहेर पडतो. सर्दी, खोकला किंवा छातीत कफ असेल तर वेलचीचे सेवन केल्याने या समस्या दूर होतात. जर तुम्हाला सर्दी झाली तर वाफ घेताना गरम पाण्याच्या भांड्यात थोडेसे वेलची तेल टाका.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com