शहरातील वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी झाडे लावणे हा उत्तम पर्याय आहे. प्रत्येकाने एक तरी रोपटे लावावे असा सल्ला दिला जातो. परंतु जागा नसल्याने किंवा वेळ नसल्याने अनेक लोक टाळाटाळ करतात. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होणार आहे. शहरातील अपुऱ्या जागेमुळे खूप मोठी होणारी झाडे लावता येत नाही. त्यामुळे कुंडीत अगदी लहान झाडे लावतात.
झाडे लावणे ही खूप चांगली गोष्ट आहे. झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो. पर्यावरणाचे संरक्षण होते. यासाठी किमान एक तरी झाडे लावूया असा संकल्प अनेक लोक करतात. परंतु कमी जागेत कोणते झाडं योग्य असेल? ते आपल्यासाठी सोयीस्कर आणि शारीरीक आरोग्यासाठी चांगले आहे का ? असे अनेक प्रश्न असतात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला आज अशा रोपट्यांची माहिती देणार आहोत. जे तुम्ही खूप कमी जागेत लावू शकतात आणि त्याचे खूप जास्त फायदे आहेत.
तुळस
तुळस हे आयुर्वेदिक वनस्पती आहे. तुळशीचे पुरातन काळापासून खूप जास्त महत्त्व आहे. तुळशीचे शरीरासाठी खूप जास्त फायदे आहे. सर्दी, खोकला, त्वचारोग, हृदयरोग, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. एखाद्या कुंडीत तुम्ही तुळशीचे रोपटे सहज लावू शकतात.
कोरफड
कोरफड हे अनेक आजारांवर फायदेशीर आहे. घरी तुम्ही कोरफडीचे रोप लावू शकतात. कोरफडीमुळे त्वचेसंबंधित अनेक आजार दूर होतात. तसेच केसांसाठीही कोरफड फायदेशीर असते.
कढीपत्ता
रोजच्या जेवणात आपण कढीपत्ता वापरतो. कढीपत्ता खालल्याचे अनेक फायदे आहेत. कढीपत्त्यामुळे केस दाट आणि काळे होतात. कढीपत्ता खालल्याने अनेक आजार दूर होतात. कढीपत्त्याचे झाड तुम्ही एक कुंडीतदेखील लावू शकतात.
मनी प्लांट
मनी प्लांट हे घरासाठी शुभ असल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे, मनी प्लांट तुम्ही पाणी आणि मातीत या दोन्हींमध्ये लावू शकता. यामुळे घरातील हवा शुद्ध राहते. घरात लक्ष्मी आणि समृद्धी नांदते असे म्हणतात. अत्यंत लहान जागेत तुम्ही हे झाड लावू शकतात.
चमेली
फुलांचा सुवास सर्वांनाच आवडतो. तुम्ही तुमच्या घरात चमेलीचे रोपटे लावू शकतात. चमेलीचे फुले तुमच्या बागेतील सौंदर्य वाढवतील. त्याचा सुवास सर्वत्र पसरेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.