Pune News: जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्याचं तुरुंगातून कसरत करून पलायन; नंतर स्वतःच झाला हजर; नेमकं कारण काय?

Yerwada Jail News: जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्याचं तुरुंगातून कसरत करून पलायन; नंतर स्वतःच झाला हजर; नेमकं कारण काय?
Yerwada Jail News
Yerwada Jail NewsSaamtv
Published On

Pune Crime News:

येरवड्यातील खुल्या जिल्हा कारागृहातून पळून गेलेला कैदी आज स्वत:हून कारागृहात हजर झाला आहे. खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी आशिष भरत जाधव हा सोमवारी कारागृहातून पळून गेला होता.

येरवडा येथील खुल्या जिल्हा कारागृहातून आशिष जाधव या कैद्याने पलायन केले होते. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी कैद्याच्या नातेवाइकांशी संपर्क साधला असता, त्याची आई हृदयविकाराने आजारी होती. त्यामुळे त्याने कारागृहातून पलायन केले असावे, असा अंदाज वर्तवला जातोय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Yerwada Jail News
America Saved Khalistani : खलिस्तानी दहशतवाद्याला अमेरिकेने वाचवलं, भारताला दिला इशारा; अहवालात माहिती उघड

कैदी आशिष जाधवचे आई आणि वडील त्याला कारागृहात हजर करण्यासाठी आज घेऊन आले. कारागृह प्रशासनाने ही बाब येरवडा पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी कैद्याला ताब्यात दिलं.  (Latest Marathi News)

दरम्यान, पुण्यातील वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2008 साली एका व्यक्तीची हत्या झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी आशिष जाधवयाला अटक याला अटक केली होती. तेव्हापासून आशिष हा येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत होता.

Yerwada Jail News
Jammu-Kashmir Encounter: जम्मू - काश्मीरमध्ये सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; तीन जवान शहीद

त्याची तुरुंगातील वागणूक पाहता, त्याला येरवडा कारागृह प्रशासनाने रेशन विभागात काम करण्यासाठी नियुक्त केलं होतं. या कामादरम्यानच तो पळून गेला होता, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र आता पुन्हा तो तरुंगात परतला आहे.

येरवडा तुरुंगात कडक पहारा असतो. यातून हा कैदी पळून जाण्यात यशस्वी कसा झाला. याचा शोध पोलीस घेत असून आणि यावर नव्याने उपाय योजना आखात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com