BJP Lok Sabha Candidates Saam Tv
देश विदेश

BJP Candidate List: यादी जाहीर होताच भाजपमध्ये भूकंप! माजी मंत्री, आमदारांसह दिग्गज नेत्यांचे राजीनामे; अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर

Haryana Assembly Election 2024: भाजपमध्येच अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली असून अनेक नेत्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. उमेदवारी नाकारल्यामुळे या नेत्यांनी नाराजी दर्शवत पक्षातील महत्वांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Gangappa Pujari

Haryana BJP Leaders Resign: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्ष तसेच काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.. भारतीय जनता पक्षाकडून हरियाणामधील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ६७ जणांच्या उमेदवारीची पहिली यादी जाहीर होताच भाजपमध्येच अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली असून अनेक नेत्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. उमेदवारी नाकारल्यामुळे या नेत्यांनी नाराजी दर्शवत पक्षातील महत्वांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळणार आहे.

हरियाणा भाजपमध्ये भूकंप!

हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांसाठी एकाच टप्प्यात 5 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. त्याआधी भाजपला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसले आहेत. 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतरच हरियाणा भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर उमेदवारी न मिळाल्याने अनेक दिग्गज नेत्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तीन नेत्यांनी राजीनामे सादर केले आहेत.

दिग्गज नेत्यांनी दिले राजीनामे

आता हरियाणा भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री कर्णदेव कंबोज यांनी राजीनामा दिला आहे. कर्णदेव कंबोज यांना उंद्री विधानसभेचे तिकीट हवे होते. उंद्री विधानसभेचे तिकीट नाकारल्याने कंबोज संतापले होते. पक्षाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला. त्याआधी दादरी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ ​​भल्ले, रतिया येथील आमदार लक्ष्मण नापा भाजप युवा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि सोनीपत विधानसभा निवडणूक प्रभारी अमित जैन यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे.

कोणी कोणी दिले राजीनामे?

भाजप युवा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि सोनीपत विधानसभा निवडणूक प्रभारी अमित जैन यांनी राजीनामा दिला. तसेच उकलानामधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले भाजप नेते समशेर गिल यांनी जेजेपीमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री अनुप धनक यांना उकलानामधून उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ पक्षाध्यक्षांकडे राजीनामा पाठवला आहे. तसेच हरियाणा भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुखविंद मंडी हिस्सारमधील भाजप नेते दर्शन गिरी महाराज, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सीमा गबीपूर यांनीही नाराजी दर्शवत पक्षाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री नायबसिंग सैनी लाडवा येथून निवडणूक लढवणार आहेत. त्याचबरोबर हरियाणाचे सभापती ज्ञानचंद गुप्ता पंचकुलातून, हरियाणा भाजपचे माजी अध्यक्ष ओम प्रकाश धनखर हे बदलीमधून, माजी सभापती कंवर पाल गुर्जर जगाधरीतून, माजी गृहमंत्री अनिल विज अंबाला कँटमधून आणि माजी खासदार सुनीता दुग्गल रतियामधून निवडणूक लढवणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: औसामध्ये भाजपचे अभिमन्यू पवार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra exit polls : माकप डहाणूचा गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT