Maharashtra Politics : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? बाळासाहेब थोरात यांनी थोडक्यात सांगितलं

balasaheb thorat big reaction on mahavikas aghadi : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. या चर्चांवर बाळासाहेब थोरात यांनी थोडक्यात सांगितलं आहे
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? बाळासाहेब थोरात यांनी थोडक्यात सांगितलं
Maharashtra Politics Saam tv
Published On

सचिन बनसोडे, साम टीव्ही प्रतिनिधी

अहमदनगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी बैठकीचा सपाटा लावला आहे. महाविकास आघाडीच्या पहिल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आधीच जाहीर करण्याच्या सूचना नेत्यांना दिल्या. त्यानंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा कोण असणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याहबाबत महत्वाचं भाष्य केलं आहे.

महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य करताना बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की, 'मुख्यमंत्रिपदाचा विषय फार महत्वाचा नाही. मुख्यमंत्री कोण होणार, हे आम्ही एकत्र बसून ठरवू. महायुतीचे सरकार घालवणे हा प्राधान्यक्रम आहे. राज्याला चांगलं सरकार देणं ही आमची जबाबदारी आहे'.

लाडकी बहीण योजनवरून थोरातांची टीका

लाडकी बहीण योजनेवरून महायुतीवर बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं आहे. 'महायुतीत मोठे वाद आहेत. मुलींवर अत्याचार करणारे मोकाट फिरताय. त्यांना लाडक्या बहिणींवर बोलण्याचा काय अधिकार आहे? सत्तेसाठी चाललेला केविलवाणा खटाटोप आहे. हे आमच्या लाडक्या बहिणींना चांगलच समजतंय, असे थोरात यांनी सांगितले.

कन्या जयश्री थोरांतांच्या उमेदवारीच्या चर्चांवर बाळासाहेब स्पष्टच बोलले

विधानसभा निवडणुकीत महायुतीचं आव्हान आहे का, यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, 'आम्हाला महायुतीचे आव्हान वाटत नाही. जनतेने या सरकारला नाकारले आहे. लोकसभा निवडणुकीत ते दिसून आले. महाविकास आघाडी 180 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात या विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. यावर भाष्य करताना बाळासाहेब थोरात म्हणाले, 'जयश्री आता सार्वजनिक जीवनात काम करत आहे. लोकांचा अंदाज घेत आम्ही पुढे जातोय. आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ'.

मुख्यमंत्रिपदाच्या नावांच्या चर्चांवर भाष्य करताना थोरात म्हणाले, 'कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून आमची नावं घेतली जातात. त्याला आम्ही फार महत्त्व देत नाही. आमच्यासाठी महायुती सरकार घालवणे महत्त्वाचे आहे'.

एसटी कर्मचारी संपावर थोरात काय म्हणाले?

एसटी कर्मचारी संपावरून थोरातांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. 'एसटी हे सर्वसामान्यांचे वाहन आहे. मात्र एसटी गाड्यांची दुरवस्था दिसून येत आहे. संप म्हणजे कर्मचाऱ्यांची मोठी अवहेलना आहे. सरकार दुसरीकडे पैशांची उधळपट्टी करत आहे. भ्रष्टाचारसाठी स्वतःच्या आमदारांवर पैसा उधळला जात आहे. एसटीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. चांगलं जीवन मिळण्याकरता कर्मचारी विलीनीकरण मागत आहेत. विलिनीकरण नाकारायचे आणि पगारवाढ पण देत नाहीत', असे थोरात पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com