Balasaheb Thorat News : विधानसभेत जनतेचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने : बाळासाहेब थोरात

Sangamner News : महाराष्ट्रात आणि जनतेत असलेल्या वातावरणाचा परिणाम हा लोकसभेला दिसला आहे. महायुतीत सध्या सगळी गडबड
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSaam tv
Published On

सचिन बनसोडे 

संगमनेर (अहमदनगर) : नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात बदल पाहण्यास मिळाला आहे. महाराष्ट्रात आणि जनतेत असलेल्या वातावरणाचा परिणाम हा लोकसभेला दिसला आहे. महायुतीत सध्या सगळी गडबड असून महायुती सरकारचं गठण ज्या पद्धतीने झाले आहे; त्यावरच जनतेचा आक्षेप आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जनता महाविकास आघाडीच्या बाजूने कल देणार असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. 

Balasaheb Thorat
Palghar Zp School : पाच वर्गांसाठी एकच शिक्षक; पालघर जिल्हा परिषद शाळेतील २६०० शिक्षकांची पद रिक्त

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या हस्ते दंडकारण्य अभियानाची सुरूवात आज झाली. अभियानाचे यंदा १९ वे वर्ष असून अभियानाच्या माध्यमातून आजतागायत हजारो वृक्षांची लागवड तसेच संवर्धन झाले असून यंदाच्या अभियानात बाळासाहेब थोरात यांनी वृक्षारोपण करत (Sangamner) संगमनेर तालुक्यातील चंदनगड येथे केली अभियानाची सुरुवात केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपले मत मांडले आहे. 

Balasaheb Thorat
Shirdi Sai Baba : शिर्डीत आषाढीनिमित्त १२ टन साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद; साईभक्तांना केला जातोय वाटप

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय 
थोरात यांनी सांगितले, कि आमचे काही लोक वेगळं वागतील याची खात्री होती. त्यांना आणखी काही जणांची दुर्दैवाने जोड मिळाली हि वस्तुस्थीती असल्याचे थोरात यांनी काँग्रेस आमदारांनी युतीला केलेल्या मतदानावर केले आहे. तर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय घेतले गेले. त्यात लाडकी बहीण योजना आहे. (Mahavikas Aghadi) त्यामुळे आपल्या मतात वाढ होईल असं त्यांना वाटत आहे. मात्र सरकारचं गठणच लोकांना मान्य नाही. त्यांची दिशा चातूर्वणाकडे घेऊन जाणारी असून जनता यास भुलणार नाही आणि पूरोगामी विचाराच्या बाजूने निर्णय देईल; असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com