Shirdi Sai Baba
Shirdi Sai BabaSaam tv

Shirdi Sai Baba : शिर्डीत आषाढीनिमित्त १२ टन साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद; साईभक्तांना केला जातोय वाटप

Shirdi News : आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांची प्रचंड गर्दी झालेली पाहण्यास मिळत आहे. विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी रीघ लागली आहे. त्यानुसार शिर्डीत देखील साई दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे
Published on

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहमदनगर) : सबका मालिक एक असा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत देखील आषाढी एकादशीचा उत्साह दिसून येत आहे. शिर्डी माझे पंढरपूर ही भावना घेऊन आज साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत. आषाढी एकादशी निमित्ताने साई प्रसादालयात भाविकांसाठी खास १२ टन साहित्य वापरून साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद बनवण्यात आला आहे.

Shirdi Sai Baba
Palghar Zp School : पाच वर्गांसाठी एकच शिक्षक; पालघर जिल्हा परिषद शाळेतील २६०० शिक्षकांची पद रिक्त

आज आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त पंढरपुरात भाविकांची प्रचंड गर्दी झालेली पाहण्यास मिळत आहे. विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी रीघ लागली आहे. त्यानुसार शिर्डीत (Shirdi) देखील साई दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. शिर्डीत येणाऱ्या भाविकांसाठी साई संस्थानकडून प्रसादालयात खास साबुदाणा खिचडीचा प्रसाद देण्यात आला आहे. तब्बल १२ टन साहित्याचा वापर यासाठी करण्यात आला आहे. यात साबुदाणा ६ हजार किलो, शेंगदाणे ५ हजार किलो व बटाटा २ हजार, तूप १ हजार किलो यासह मिर्ची असे साहित्य हा खिचडी महाप्रसाद बनवण्यासाठी वापरण्यात आले आहे.  

Shirdi Sai Baba
Gadchiroli Zp School : धक्कादायक वास्तव.. गडचिरोलीतील ८४ जिल्हा परिषद शाळा शिक्षकाविना; शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

शिर्डीत येत असलेला प्रत्येक भाविक प्रसादाचा लाभ घेताना पाहण्यास मिळत आहे. शिर्डी पंचक्रोशीतील स्थानिक भाविक आवर्जून या प्रसादरूपी खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. सोबत देशभरातुन आलेल्या भाविकांनाही प्रसाद भोजनात दररोज दिल्या जाणाऱ्या भाजी, पोळी, वरण- भाताऐवजी साबुदाणा खिचडी दिली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com