Jammu Kashmir Election: जम्मू-काश्मीर आणि मागील ३ निवडणुका; 10 वर्षांनंतर होणाऱ्या विधानसभेत कुणाची विकेट जाणार?

Jammu Kashmir Election Update: जम्मू काश्मीरमध्ये २०१४ पासून तीन निवडणुकांमध्ये विजयी आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या मतांमधील अंतर वाढलं आहे, तर खूप कमी जागांवर कमी फरकाने उमेदवार विजयी झाले आहे, त्यामुळे यावेळी अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता आहे.
Jammu Kashmir Election
Jammu Kashmir Election Saam Digital
Published On

Assembly to be held in Jammu and Kashmir after 10 years: केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. भाजप, कॉंग्रेस, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षांची या निवडणुकांमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान २०१४ पासून तीन निवडणुकांमध्ये विजयी आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या मतांमधील अंतर वाढलं आहे, तर खूप कमी जागांवर कमी फरकाने उमेदवार विजयी झाले आहे. २०१४ पासून जम्मू काश्मीरमध्ये अनेक बदलही झाले आहेत. त्यामुळे कोणत्याच पक्षालाही निवडणूक सोपी असणार नाही अनेक ठिकाणी अटतटीच्या लढती पहायला मिळण्याची शक्यता आहे.

Jammu Kashmir Election
IPO Risk Factors : IPO म्हणजे काय? खरंच कोट्यवधी रुपये कमवता येतात का? गुंतवणुकीत किती रिस्क असते? वाचा A टू Z माहिती

2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने देशात मोठा विजय मिळवत केंद्रात सत्ता स्थापन केली होती. मात्र जम्मू आणि काश्मीरमध्येही केवळ तीन जागा जिंकता आल्या होत्या (ज्यात तेव्हा लडाखचा समावेश होता). मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वात उर्वरित तीन जागांवर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (PDP) बाजी मारली होती.

2014 च्या विधानसभा निवडणुकाही दशकातील सर्वात अटीतटीच्या ठरल्या होत्या. PDP 28 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यात उदयाला आला होता. मात्र 87 सदस्यांच्या सभागृहात बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. PDP ने जिंकलेल्या सर्व जागा काश्मीर प्रांतातील होत्या. या निवडणुकी भाजपने 25 जागा जिंकल्या होत्या, मात्र सर्व जागा जम्मू प्रातांतील होत्या. त्यावेळी PDP ला समर्थन देऊन भाजपने जम्मू काश्मीरमध्ये युती सरकार स्थापन केलं. फारूक अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्सने (NC) 15 जागा जिंकल्या होत्या. 2014 च्या लोकसभा निवडणुका होईपर्यंत नॅशनल कॉन्फरन्ससोबत असलेल्या कॉंग्रेसने 12 जागा जिंकल्या होत्या. दोन्ही पक्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेत होते.

या निवडणुकीत 87 जागांपैकी 50 विधानसभा जागा अशा होत्या ज्या एकूण मतदानाच्या 10% पेक्षा कमी फरकाने जिंकल्या होत्या. ज्यात PDP च्या 18 जागांचा समावेश आहे. तर नॅशनल कॉन्फरन्स 13, भाजपने अशा ७ आणि काँग्रेसच्या ६ जागांचा समावेश आहे. तर अपक्ष ६ जागांचाही समावेश आहे. या ५० जागांवरील सरासरी विजयाचा फरक 6,700 मतांचा होता.

कमी मतफरकारने जिंकलेल्या जागांध्ये PDP च्या सर्वाधिक जागा आहेत. मात्र कमी मतफरकारने याच पक्षाने सर्वाधिक जागा गमावल्या होत्या. ने कमी फरकाने जिंकलेल्या सर्वाधिक जागा जिंकल्या, परंतु कमी फरकाने जिंकलेल्या सर्वाधिक जागा त्यांनी गमावल्याही. यामध्ये PDP ने 18 जागांवर एकूण मतदानाच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी फरकाने जागा जिंकल्या होत्या. तर नॅशनल कॉन्फरन्सने 16 जागांमध्ये, काँग्रेसने ९ आणि भाजपने ३ जिंकल्या होत्या.

भाजपच्या विजयी जागांवरील मतांता फरक 14,428 मतांचा होता. मात्र तो मोदी लाटेचा काळ होता. तर काँग्रेसच्या विजयी जांगावरील मतांचा फरक 5,290, तर PDP विजयी जांगावरील मतांचा फरक 3,754 आणि नॅशनल कॉन्फरन्सचा 2,295 मतांचा फरक होता. 52 जागांवर तिसऱ्या उमेदवाराने विजयी फरकापेक्षा अधिक मतं मिळवली आहेत.

Jammu Kashmir Election
Vande Bharat Sleeper Train: वंदे भारतमध्ये गरम पाण्याने अंघोळही करता येणार, नवी ट्रेन कशी आहे? जाणून घ्या वैशिष्ट्ये

2019 लोकसभा निवडणूक २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये, विधानसभा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर ८७ पैकी फक्त २२ मतदारसंघांमध्ये विजयाची मार्जिन १० टक्क्यांपेक्षा कमी होती. आर्टिकल ३७० रद्द आणि जम्मू आणि काश्मीर (J&K) दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजित होण्याच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये, भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्सने प्रत्येकी तीन जागा जिंकल्या (लडाखसह, ज्यावर भाजपा विजय मिळवला). पीडीपीने यावेळी २०१४ मध्ये जिंकलेल्या जागाही गमावल्या गोत्या. तर काँग्रेसला खातंही उघडता आलं नाही.

विधानसभा-विभाग स्तरावर, NC ने एकूण मतांच्या 10 टक्यांपेक्षा कमी फरकाने सर्वाधिक जागा जिंकल्या, 11, त्यानंतर भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी तीन आणि PDP आणि सजाद गनी लोनच्या नेतृत्वाखालील पीपल्स कॉन्फरन्स ( पीसी) प्रत्येकी एक. अशा तीन विभागात अपक्षांनी आघाडी घेतली. सर्व विधानसभा विभागांमध्ये सरासरी विजयी फरक 17,000 मतांचा होता जे २०१४ च्या विधानसभा निवडणूकांच्या सरासरीपेक्षा सुमारे तीन पट जास्त आहे.भाजपचं विधानसभा मतदारसंघात विजयाचं मार्जिनमध्ये ३२,२१२ मतांचं होतं. त्यापाठोपाठ काँग्रेस २३,९८१, NC ने ३,२६८, आणि PDP ने ३२० मतांची सरासरी मार्जिन होतं. जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करून केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर २०२२ मध्ये मतदारसंघांच्या सीमांचा पुनर्रचना करण्यात आली.

त्यानंतर नुकताच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्से २ जागा जिंकल्या. तर काश्मीर घाटीतील एक जागा फूटीरतावादी नेता अब्दुल राशिद शेख यांनी जिंकली आहे.

Jammu Kashmir Election
Crime News : धक्कादायक! IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू; विद्यापीठाच्या वसतिगृहात आढळला मृतदेह

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com