IPO Risk Factors : IPO म्हणजे काय? खरंच कोट्यवधी रुपये कमवता येतात का? गुंतवणुकीत किती रिस्क असते? वाचा A टू Z माहिती

IPO Risk Percentage : एखादी कंपनी प्रथमच आपले शेअर्स सार्वजनिकपणे विक्रीसाठी उपलब्ध करते त्याला IPO म्हणतात. यानंतर या कंपनीचे शेअर्स खरेदी आणि विक्रीसाठी उपलब्ध होतात.
IPO Risk Factors
IPO Risk FactorsSaam Digital
Published On

शेअर मार्केट म्हटलं की डोळ्यासमोर येतात ये कोट्यवधीचे आकडे.. मोठ्या गुंतवणुकीसह झटपट पैसे कमवण्याचा एक सोपा मार्ग... कंपन्यांना जसं भाडंवल उपलब्ध होतं, नफा मिळतो, तसंच गुतंवणूकदारांना मोठा फायदाही मिळतो. अलिकडे शेअर मार्केटमध्ये IPO ची क्रेझ वाढली आहे. अनेक लहान लहान कंपन्या IPO सार्वजनिक करून कोट्यवधी रुपये कमवत आहेत... त्यामुळे छोट्या शेअर होल्डर्सना खरंच इतके पैसे कमवता येतात का? गुंतवणुकी किती रिस्क असते? याविषयी जाणून घेऊया..

IPO Risk Factors
Gold-Silver Todays Rate : सोन्याचे भाव घसरले, चांदीही किंचित झाली स्वस्त; तुमच्या शहरातील दर काय?

इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (Initial Public Offering) म्हणजेच IPO ही एक अशी प्रक्रिया ज्याद्वारे एखादी कंपनी प्रथमच आपले शेअर्स सार्वजनिकपणे विक्रीसाठी उपलब्ध करते. कंपनीसाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो, कारण या प्रक्रियेत कंपनी खासगी मालकीतून सार्वजनिक मालकीमध्ये जाते. यामुळे कोणत्याही व्यक्तीला त्या कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात खरेदी किंवा विक्री करण्याची संधी मिळते.

IPO कसे कार्य करते?

एखादी कंपनी जेव्हा सार्वजनिक होण्याचा निर्णय घेते, तेव्हा आधी एक किंवा अधिक गुंतवणूक बँकांना नियुक्त करते. या बँका अंडरराइटर म्हणून काम करतात. कंपनीला IPO ची किंमत ठरविण्यास, किती शेअर्स जारी करावेत याचा निर्णय घेण्यात, आणि IPO कधी करावा, हे ठरवण्यात मदत करतात.

यासाठी कंपनी आधी पूर्व तयारी करते. आर्थिक लेखापरीक्षा करणे, आणि गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी आवश्यक माहिती सार्वजनिक कशी करावी याचा समावेश असतो.

कंपनी संबंधित नियामक संस्थेकडे, भारतात सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (SEBI) नोंदणी करते. या दस्तऐवजात कंपनीचा व्यवसाय, आर्थिक स्थिती, आणि गुंतवणुकीसाठी असलेला धोका याबद्दल सविस्तर माहिती दिली जाते.

कंपनी आणि अंडरराइटर सुरुवातीची शेअरची किंमत ठरवतात. ही किंमत कंपनीची आर्थिक स्थिती, बाजारातील स्थिती आणि गुंतवणूकदारांची मागणी यावर अवलंबून असते.

IPO च्या दिवशी कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात सूचीबद्ध होतात आणि व्यवहार सुरू होतो. त्यानंतर सार्वजनिकपणे कोणालाही या शेअर्सची खरेदी-विक्री करता येते.

IPO Risk Factors
Ladki Bahin Yojana : फॉर्म भरलाय, पण पैसेच आले नाहीत; नेमकं कारण काय? कसं तपासायचं? जाणून घ्या

IPO मध्ये गुंतवणूक कशी करावी?

IPO शेअर्स खरेदी करण्याची संधी मिळाली आणि जर त्या शेअरने बाजारात चांगली कामगिरी केली, तर त्या शेअर्सच्या विक्रीतून नफा कमवता येऊ शकतो. सामान्य गुंतवणूकदारांसाठी IPO किंमतीवर शेअर्स मिळविणं कठीण असतं. कारण हे शेअर्स संस्थागत गुंतवणूकदारांना दिले जातात.

जर IPO किंमतीवर शेअर्स खरेदी करता आले नाहीत, तर शेअर्स बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर खरेदी करता येतील. जर कंपनी चांगली कामगिरी करत असेल आणि शेअरची किंमत वाढत असेल, तर त्यातून मोठा नफा मिळू शकतो.

काही गुंतवणूकदार IPO शेअर्स दीर्घकालीन ठेवण्यासाठी प्राधान्य देतात, कंपनीच्या भविष्यातील वाढीवर चॅलेंज स्वीकारते. जर कंपनी यशस्वी ठरली, तर शेअर्सचे मूल्य मोठ्या प्रमाणात वाढू शकतं आणि मोठा नफा मिळू शकतो.

काही गुंतवणूकदार IPO शेअर्स खरेदी करतात आणि व्यवहार सुरू झाल्यानंतर लगेच विक्री करतात. किंमतीतील वाढीचा फायदा घेत, यामध्ये नफा मिळवता येतो. मात्र हे जोखमीचं ठर शकतं, कारण सुरुवातीच्या शेअर्सने घेतलेल्या उसळीनंतर किंमतीत झपाट्याने घसरण होऊ शकते.

स्वतंत्र IPO शेअर्स निवडण्याची जर रिस्क वाटत असेल तर IPO वर लक्ष केंद्रित करणारे म्युच्युअल फंड्स किंवा ETFs मध्ये गुंतवणूक करू शकता. हे फंड्स विविध IPO मध्ये गुंतवणूक करून जोखीम पत्करतात आणि नवीन सार्वजनिक कंपन्यांच्या एकूण कामगिरीचा फायदा घेण्याची संधी देतात.

IPO मध्ये गुंतवणुकीचे धोके

IPO शेअर्स सुरुवातीच्या दिवसांत अस्थिर असू शकतात, बाजारातील अनिश्चिततेमुळे किंमतीत मोठे चढउतार होऊ शकतात.

अशा कंपन्यांच्या विपरीत, IPO मध्ये मर्यादित ऐतिहासिक डेटा असतो. त्यामुळे भविष्यातील अंदाज लावणं कठीण होतं.

प्रारंभिक गुंतवणूकदारांना लॉक-अप कालावधीसाठी शेअर्स विक्री करण्यास प्रतिबंधित केलं जातं. एकदा हा कालावधी संपला की मोठ्या प्रमाणात शेअर्स बाजारात येऊ शकतात, ज्यामुळे किंमत खाली येऊ शकते.

IPO च्या यशावर एकूण बाजार स्थितीचा मोठा प्रभाव असतो. मजबूत स्थितीत बाजार IPO च्या कामगिरीला चालना देऊ शकतो, त्यामुळे डाऊन मार्केटमध्ये खराब परिणाम होऊ शकतात.

IPO गुंतवणूकदारांना यशस्वी कंपनीच्या प्रारंभिक टप्प्यात सहभागी होण्याची संधी देते. परंतु, इतर कोणत्याही गुंतवणुकीप्रमाणेच यातही जोखीम आहे. IPO मध्ये गुंतवणूक करण्याआधी काळजीपूर्वक अभ्यास करणे, बाजाराची स्पष्ट समज असणे, आणि दीर्घकालीन गुंतवणूक धोरणाचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यामुळे या जोखमी कमी करता येतात आणि नफा मिळण्याची शक्यता वाढते.

IPO Risk Factors
UPI ATM: आता कार्डशिवाय एटीएममधून बिनधास्त काढा पैसे, जमाही करता येतील ; काय आहे UPI ATM?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com