UPI ATM: आता कार्डशिवाय एटीएममधून बिनधास्त काढा पैसे, जमाही करता येतील ; काय आहे UPI ATM?

What Is UPI ATM: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन सर्व्हेिस लाँच केली आहे. या सर्व्हिसमध्ये तुम्ही एटीएमकार्डशिवाय यूपीआयच्या माध्यमातून पैसे जमा करु शकतात त्याचसोबत काढूदेखील शकतात.
UPI ATM
UPI ATMGoogle
Published On

सध्या सर्वकाही डिजिटल झाले आहे. त्यामुळे आपण कोणतेही व्यव्हार करताना डिजिटल पेमेंटचा वापर करतो. डिजिटल पेमेंटमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. त्यातच आता तुम्ही एटीएममध्येही पैसे जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी UPI चा वापर करु शकतात. यूपीआयचा वापर करुन आता एटीएममधून पैसे काढणे सोपे होणार आहे.

UPI ATM
Government Schemes : स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी खिशात पैसे नाहीत? केंद्र सरकारच्या 'या' योजनांची होईल मोठी मदत

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी नवी सर्व्हिस सुरु केली आहेत. या सर्व्हिसमध्ये ग्राहक एटीएममध्ये कॅश जमा करु शकणार आहेत. ग्राहकांना एटीएममधून कॅश काढणे किंवा जमा करणे सोपे व्हावे यासाठी ही सर्व्हिस सुरु केली आहे.डेबिट कार्डशिवाय पैसे जमा करण्याच्या प्रोसेसला UPI इनऑपरेटेबल कॅश डिपॉझिट असे म्हणतात. हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने डेव्हलप केले आहे.

एटीएममध्ये UPI च्या माध्यमातून पैसे कसे जमा करायचे?

  • एटीएममध्ये पैसे जमा करण्याआधी सर्वप्रथम तुमच्या घराजवळच्या एटीमएम मशीनमध्ये रिसायक्लिंग मशीन आहे की नाही हे चेक करा. त्याचसोबत एटीएम UPI-ICD ला सपोर्ट करणारे असायला हवे.

  • सर्वप्रथम एटीएमच्या स्क्रिनवरील कॅश जमा करण्याच्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर UPI आयडीला जोडलेला मोबाईल नंबर किंवा IFSC कोड टाका. त्यानंतर पैसे स्लॉटमध्ये ठेवा. हे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील.

UPI ATM
SBI Scheme: फक्त ७३० दिवस गुंतवणूक करा अन् मिळवा भरघोस व्याज; SBI ची सर्वोत्तम टर्म डिपॉझिट योजना काय आहे?

UPI च्या माध्यमातून एटीएममधून पैसे कसे काढायचे?

  • तुमचा UPI नंबर रजिस्टर असेल तरच तुम्ही UPI-ATMचा वापर करु शकतात.

  • एटीएममध्ये जाऊन तुम्ही UPI Cash Withdrwl/Cardless Cash किंवा QR Cash च्या ऑप्शनवर क्लिक करा.

  • यानंतर एटीएम मशीनमध्ये तुम्हाला जेवढे पैसे काढायचे आहेत ती अमाउंट टाकावी लागेल.

  • यानंतर तुम्हाला एटीएम मशीनवर डायनामिक क्यूआर कोड दिसेल. त्यानंतर तुम्ही यूपीआय अॅपचा वापर करुन स्कॅन करु शकतात. यानंतर तुम्ही UPI पिन टाकून पैसे काढू शकतात.

UPI ATM
Government Schemes For Girls: मुलींसाठी सरकारच्या खास योजना! शिक्षणापासून ते लग्नापर्यंत मिळणार आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com