Bhandara News : सिहोरा येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिसात गुन्हा दाखल

Bhnadara News : मशीन पूर्णपणे न तुटल्याने किंवा काही नागरिकांना ही घटना लक्षात आली असावी; या कारणांनी चोरट्यांनी तिथून काढता पाय घेतला
Bhandara News
Bhandara NewsSaam tv
Published On

शुभम देशमुख

भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या सिहोरा पोलीस स्टेशनंच्या अगदी हाकेच्या अंतरावर आणि तुमसर- बपेरा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मशीन न तुटल्याने चोरट्यांचा हा प्रयत्न फसला. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. बैंक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक यांनी पोलिसांत तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhandara News
Shahada News : अज्ञातांकडून शेतकऱ्यांची आंब्याची बाग उध्वस्त; शहादा तालुक्यातील प्रकार, शेतकऱ्यांचे नुकसान

तुमसर- बपेरा या वर्दळीचा राष्ट्रीय महामार्गावर बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम आहे. अज्ञात चोरट्याने या एटीएमच्च्या मशीन समोरील बाजूच्या लॉकरचे लोखंडी झाकण उघडले. एटीएम मशीनमधून रोख रक्कम बाहेर येण्यासाठी असलेला रोलर तोडून मशीनमधील रक्कम चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मशीन पूर्णपणे न तुटल्याने किंवा काही नागरिकांना ही घटना लक्षात आली असावी; या कारणांनी चोरट्यांनी तिथून काढता पाय घेतला.  

Bhandara News
Bhiwandi Crime : मोबाईल, घरपोडी प्रकरणी चार जण ताब्यात; ८ लाखांचे मोबाईल केले जप्त

रात्रीच्या सुमारास हि घटना घडली असून सदरचा प्रकार आज सकाळी नागरिकांच्या लक्षात आली. यानंतर नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली असता, पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली. सदर घटनेची माहिती होताच सिहोरा ठाण्याचे ठाणेदार नितीन मदणकर यांनी घटनास्थळ गाठून चौकशी सुरु केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com