Shahada News : अज्ञातांकडून शेतकऱ्यांची आंब्याची बाग उध्वस्त; शहादा तालुक्यातील प्रकार, शेतकऱ्यांचे नुकसान

Nandurbar News : शहादा तालुक्यातील मध्ये प्रदेश सीमा लगत असलेले शहाणा गावातील राजेंद्र भांडारी या शेतकऱ्याने वन विभागमार्फत दिलेला वनपट्टा गट क्रमांक ५३ मध्ये फळबाग लागवड केली होती
Shahada News
Shahada NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : शहादा तालुक्यातील शहाणा येथील शेतकऱ्यांचे २५० आंब्याचे झाडे अज्ञात व्यक्तींनी केले उधवस्त केले. यात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आंब्याची बाग उध्वस्त करणाऱ्या अज्ञात व्यक्तींच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

Shahada News
Online Fraud : ऑनलाईन जॉबचे आमिष दाखवून १८ लाख रुपयांची फसवणूक; धाराशिव सायबर पोलिसात गुन्हा दाखल


शहादा (Shahada) तालुक्यातील मध्ये प्रदेश सीमा लगत असलेले शहाणा गावातील राजेंद्र भांडारी या शेतकऱ्याने वन विभागमार्फत दिलेला वनपट्टा गट क्रमांक ५३ मध्ये फळबाग लागवड केली होती. याठिकाणी २५० आंब्याचे रोपे बायफ मार्फत दिले असता सदरील शेतकरी (Farmer) यांनी परिश्रम घेऊन जगवली होती. दरम्यान मध्य प्रदेश येथील ४० ते ५० अज्ञात व्यक्तीकडून भरदिवसा जोर जबरदस्तीने सर्व झाडे उपटून नुकसान केले. यामुळे सदरील व्यक्तीवर शासनाने कडक कार्यवाही करावी जेणेकरून गरीब शेतकरीला परत या घटनेला सामोरे जावे लागणार नाही. 

Shahada News
Buldhana News : अतिवृष्टी मदतीत कोट्यावधीचा घोटाळा; दोन तलाठीसह एक संगणक ऑपरेटरवर गुन्हा दाखल

सदरील शेतकऱ्यांनी कसेबसे पैसा उभारून रोपे जगविली होती. मात्र एवढे नुकसान केले असताना त्यांनी कसे जगावे याकरिता त्यांना सदरील व्यक्तीवर कडक कार्यवाही करावी व पंचनामा करून तात्काळ भरपाई मिळावी. अन्यथा सर्व गावकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे शहाणा गावातील सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मार्फत मागणी करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com