Online Fraud : ऑनलाईन जॉबचे आमिष दाखवून १८ लाख रुपयांची फसवणूक; धाराशिव सायबर पोलिसात गुन्हा दाखल

Dharashiv News : मॅसेजनुसार टास्क पुर्ण केल्यास जास्त पैसे मिळतील. त्या संदर्भातील वेगवेगळे इकॉनॉमिक टास्क पुर्ण केल्यास जास्त पैसे मिळतील; असे आमिष दाखविण्यात आले
Online Fraud
Online FraudSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: धाराशिवच्या एका तरुणाला ऑनलाईन जॉबचे आमिष दाखवून १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धाराशिव सायबर पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलिसांकडून तपस सुरु करण्यात आला आहे.

Online Fraud
Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; आज रेल्वेच्या 'या' मार्गावर मेगाब्लॉक; अनेक लोकल रद्द

सागर राम साळुंके असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. सागरला एका दिवशी मोबाईलवर जॉब (Dharashiv) संदर्भात मॅसेज आला. या मॅसेजनुसार टास्क पुर्ण केल्यास जास्त पैसे मिळतील. त्या संदर्भातील वेगवेगळे इकॉनॉमिक टास्क पुर्ण केल्यास जास्त पैसे मिळतील; असे आमिष दाखविण्यात आले. यानंतर समोरच्या व्यक्तीने सागर यांना वेगवेगळ्या खाते नंबर व युपीआय आयडीवर पैसे भरण्यास सांगितले. (Online Fraud) त्यानुसार सागरने १८ लाख  १४ हजार रुपये भरले.  

Online Fraud
Numerology Number : या तारखेला जन्मलेले व्यक्ती असतात अत्यंत भाग्यवान; कोणत्याही क्षेत्रात मिळवतात यश

ऑनलाईन पद्धतीने सागरने १८ लाखाची रक्कम भरल्यानंतर देखील त्या बदल्यात सागरला त्याचा परतावा म्हणून एकही रूपया परत आला नाही. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सागर साळुंके यांच्या फिर्यादीवरून (Cyber Police) धाराशिव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून पोलिसांनी आता तपस सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com