Government Schemes : स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी खिशात पैसे नाहीत? केंद्र सरकारच्या 'या' योजनांची होईल मोठी मदत

Government Schemes For Business : केंद्र सरकारमार्फत व्यवसाय करण्यासाठी काही योजना सुरू आहेत. या योजनांमार्फत तरुणांना ट्रेनिंग दिली जाते. शिवाय त्यांना आर्थिक सहाय्य सुद्धा केलं जातं.
Government Schemes For Business
Government SchemesSaam TV
Published On

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक तरुणाला चांगल्या पगाराची नोकरी हवी असते. तर काही तरुण व्यवसाय करण्याचा निर्णय घेतात. नोकरी करण्यापेक्षा आपला स्वत:चा एक सुंदर आणि लहानसा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना अनेकांच्या मनात येते. मात्र ही कल्पना फक्त काही व्यक्ती पूर्ण करू शकतात. याचं कारण म्हणजे स्टार्टअपसाठी लागणारी आर्थिक मदत अनेकांना जवळ पैसे नसल्याने व्यवसाय सुरू करता येत नाही.

Government Schemes For Business
Government Scheme: स्वत:चा व्यवसाय सुरू करायचाय? सरकारकडून मिळतंय हमीशिवाय ३ लाखांचं कर्ज, जाणून घ्या योजना

मात्र केंद्र सरकारमार्फत व्यवसाय करण्यासाठी काही योजना सुरू आहेत. या योजनांमार्फत तरुणांना ट्रेनिंग दिली जाते. शिवाय त्यांना आर्थिक सहाय्य सुद्धा दिलं जातं. त्यामुळे आज आपण अशाच काही खास योजनांची माहिती जाणून घेणार आहोत.

डेअरी उद्यमिता विकास योजना (DEDS)

डेअरी क्षेत्रात नागरिकांनी स्वत: रोजगार मिळवावा या उद्देशाने केंद्र सरकारने डेअरी उद्यमिता विकास योजना सुरू केली आहे. पशुपालन, मत्स्य पालन आणि डेअरी विभागाकडून चालवल्या जाणाऱ्या या योजनेत दूग्धजन्य पदार्थांपासून प्रोसेसिंग आणि मार्केटिंगपर्यंतची ट्रेनिंग दिली जाते. योजनेंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या व्यवसायाच्या एकूण खर्चाच्या 25 टक्के आणि SC/ST राखीव जागा तसेच शेतकऱ्यांना 33.33 टक्के रक्कम दिली जाते.

क्रेडिट गॅरेंटी फंड ट्रस्ट

क्रेडिट गॅरेंटी फंड ट्रस्ट केंद्र सरकारची ही योजना लघु उद्योग सुरू करणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेमार्फत सोप्या पद्धतीने कर्ज मिळवता येते. MSME मंत्रालय आणि भारतीय लघु उद्योग विकास बँक यांच्या संयुक्तविद्यमाने क्रेडिट गॅरेंटी फंड ट्रस्ट योजना सुरू करण्यात आली आहे.

सिंगल पॉइंट्स रजिस्ट्रेशन स्किम

स्टार्टअपचा प्लान डोक्यात असताना अनेक तरुणांच्या मनात लघू उद्योग असतात. अशा लघू उद्योजकांसाठीच केंद्र सरकारने सिंगल पॉइंट्स रजिस्ट्रेशन स्किम ही योजना सुद्धा सुरू केली आहे. राष्ट्रीय लघु उद्योग निगम द्वारे ही योजना सुरू आहे. या योजनेचा लाभ घेताना तुम्हाला कोणतेही शुल्क न भरता टेंडर, टेंडरमध्ये सहभाग आणि एमएसईमार्फत खरेदी करता येते.

Government Schemes For Business
Government scheme VIDEO: सरकारकडून राबवण्यात येणार 'या' पाच महत्त्वकांक्षी योजना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com