पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने कारवाई केली आहे. त्यामुळे या बँकेच्या अकाउंटवरुन कोणतेही व्यव्हार करता येणार नाही असे आरबीआयने सांगितले आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेतील सर्व व्यव्हार फक्त २९ फेब्रुवारीपर्यंत करता येणार आहेत. परंतु आता आरबीआयने पेटीएमला ही मुदत वाढवून दिली आहे. ही मुदत १५ मार्चपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे पेटीएम वॉलेट, फास्टॅग हे व्यव्हार १५ मार्च २०२४नंतरदेखील करता येणार आहे.
पेटीएम कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. कंपनीचे मेड-इन-इंडिया क्यूआर कोड, साऊंडबॉक्स आणि कार्ड मशिन १५ मार्च २०२४ नंतर देखील नेहमीप्रमाणे कार्यरत राहतील. शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) एफएक्यू रीलीज केल्यानंतर याची घोषणा केली आहे. (Latest News)
कंपनीने पूर्वीप्रमाणे मर्चंट सेटलमेंट्स सुरू राहण्यासाठी आपले नोडल खाते अॅक्सिस बँकेमध्ये (एस्क्रो खाते उघडून) हस्तांतरित केले आहे. हे व्यवस्थापन ब्रॅण्ड पेटीएमची मालक असलेली कंपनी One97 Communication Limited(OCL) च्या नोडल खात्याला रिप्लेस करण्याची अपेक्षा आहे. कंपनी त्यांची सहयोगी उपकंपनी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडसोबत या खात्याचा वापर करत होती. ओसीएलची पूर्णत: मालकीची उपकंपनी पेटीएम पेमेंट सर्विसेस लि. (पीपीएसएल) तिच्या स्थापनेपासून अॅक्सिस बँकेच्या सेवांचा वापर करत आहे.
पेटीएमचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी देखील X (मागील ट्विटर) चा संदर्भ देत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी वापरकर्त्यांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.