Reliance Market Cap: रिलायन्स इंडस्ट्रीजची मोठी झेप; २० लाख कोटी रुपये मार्केट कॅप पार करणारी देशातील पहिली कंपनी

Reliance Industries Highest Market Cap: रिलायन्स ही देशातील सर्वात जास्त मार्केट कॅप असणारी कंपनी ठरली आहे. मंगळवार १३ फेब्रुवारीला मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मार्केट कॅपने २० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. २० लाख कोटी मार्केट कॅपचा टप्पा ओलांडणारी रिलायन्स ही देशातील पहिली कंपनी आहे.
Reliance Industries Highest Market Cap
Reliance Industries Highest Market Capgoogle
Published On

Reliance Company Become First Company Which Surpass 20 Lakh Crore Market Cap

रिलायन्स ही देशातील सर्वात जास्त मार्केट कॅप असणारी कंपनी ठरली आहे. मंगळवार १३ फेब्रुवारीला मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मार्केट कॅपने २० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. २० लाख कोटी मार्केट कॅपचा टप्पा ओलांडणारी रिलायन्स ही देशातील पहिली कंपनी आहे.

२०२४ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये (Reliance Share Price) जवळपास १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज म्हणजेच १३ फेब्रुवारीला बीएसईवर कंपनीचा शेअर २९१०.४० रुपयांच्या वाढीसह उघडला आहे. मागील शेअर्सच्या किंमतीपेक्षा ही किंमत २ टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीचे शेअर्स सध्या २९५७.८० रुपयांनी विकले जात आहेत. तर कंपनीचे मार्केट कॅप २० लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. (Latest News)

२०२३-२४ च्या डिसेंबर २०२३ या तिमाहित रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा ११ टक्क्यांनी वाढून १९,६४१ कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा कंसॉलिडेटेड रिव्हेन्यू ३.२ टक्के वाढून २.४८ लाख कोटी झाला आहे. तर एका वर्षाआधी कंपनीचा कंसॉलिडेटेड रिव्हेन्यू २.४१ लाख रुपये होता. रिलायन्स इंडस्ट्रीजचा ऑपरेटिंग नफा (EBIDTA) १६.७ वाढून ४४,६७८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मार्केट कॅप ऑगस्ट २००५ मध्ये १ लाख कोटी रुपये होते. तरएप्रिल २००७ मध्ये २ लाख कोटी रुपये आणि सप्टेंबर २००७मध्ये ३ लाख कोटी रुपये होते. ऑक्टोबर २००७ मध्ये ४ लाख कोटी होते. तर त्यानंतर १२ वर्षानंतर कंपनीचे मार्केट कॅप ५ लाख रुपये कोटी रुपयापर्यंत पोहचले. त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये कंपनीचे मार्केट कॅप १० लाख कोटी रुपये होते. तर सप्टेंबर २०२१ मध्ये १५ लाख कोटी रुपये होते. त्यानंतर २०२४ मध्ये कंपनीचे मार्केट कॅप २० लाख कोटी रुपये झाले आहे. रिलायन्स ही देशातील सर्वात जास्त मार्केट कॅप असणारी कंपनी आहे.

Reliance Industries Highest Market Cap
Online Transaction: ऑनलाइन ट्रान्झॅक्शनमध्ये होणार बदल; लवकरच येणार आरबीआयची नवीन योजना

देशातील टॉप ५ मार्केट कॅप कंपन्या

रिलायन्स ही देशातील सर्वात जास्त मार्केट कॅप असणारी कंपनी आहे. कंपनीचे मार्केट कॅप २० लाख कोटी रुपये आहे. त्यानंतर टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे मार्केट कॅप १४.९१ लाख कोटी आहे. यानंतर एचडीएफसी बँक देशातील सर्वाधिक मार्केट कॅप असणारी तिसरी कंपनी आहे. कंपनीचे मार्केट कॅप १०.५७ लाख कोटी रुपये आहे. आयसीआसीआय बँकेचे मार्केट कॅप ७.११ लाख कोटी रुपये आहे. यानंतर Infosys कंपनीचे मार्केट कॅप ६.९३ लाख कोटी रुपये आहे.

Reliance Industries Highest Market Cap
Renault Duster: १२ वर्षापूर्वी मार्केट जाम करणारी कार कमबॅकसाठी सज्ज, नव्या रुपात घेणार एन्ट्री

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com