Online Transaction: ऑनलाइन ट्रान्झॅक्शनमध्ये होणार बदल; लवकरच येणार आरबीआयची नवीन योजना

Online Transaction OTP Not Required: ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करताना आपल्याला नेहमी ओटीपीची गरज पडते. पण आता यात बदल होणार आहे. आरबीआय यासाठी नवीन योजना आणत आहे.
Online Transaction
Online TransactionYndex
Published On

Online Transaction RBI New Plans

ऑनलाइन ट्रान्झॅक्शन (Online Transaction) करताना ओटीपी मोठी डोकेदुखी असतो. ही एक किचकट आणि गुंतागुंतीची तसंच वेळखाऊ प्रक्रिया आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर वेळ खर्च होतो. अनेकदा नेटवर्क नसणे, ओटीपी उशीरा मिळणे या कारणांमुळे आपली कामं अडकून पडतात किंवा उशीरा होतात. यापासून आता आपली सुटका होणार आहे. ते कसं, हे आपण जाणून घेऊ या. (latest marathi news)

ऑनलाइन व्यवहारांसाठी आता ओटीपीची (OTP) आवश्यकता नाही. आरबीआय नवीन योजना बनवत आहे. नक्की आरबीआयची ही योजना काय आहे, ती का अंमलात आणली जाणार आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी आरबीआयचा प्रयत्न

ऑनलाइन व्यवहारातून फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हे थांबवण्यासाठी आरबीआय वेळोवेळी काम करत असते. RBI आणखी एक सुरक्षितता पद्धत आणण्याची योजना करत आहे. याद्वारे ग्राहकांच्या ऑनलाइन व्यवहारांना सुरक्षितता मिळणार आहे. आता आरबीआय (RBI New Plans) ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी हे पाऊल उचलत आहे.

आरबीआयच्या नव्या योजनेमुळे तुम्हाला पेमेंट करण्यासाठी OTP ची गरज भासणार (Online Transaction OTP Not Required) नाही. सध्या, कुठेही कोणताही ऑनलाइन व्यवहार करताना पडताळणीसाठी एसएमएसद्वारे एक ओटीपी प्राप्त होतो. ही OTP पद्धत ऑनलाइन पेमेंटमध्ये कोणताही अडथळा किंवा फसवणूक होणार नाही, यासाठी सुरक्षितता प्रदान करते.

Online Transaction
Ram Mandir Online Prasad: भक्तांच्या आनंदावर विरजन! 'ऑनलाइन प्रसाद' अद्याप उपलब्ध नाही, राम मंदिर ट्रस्टची माहिती

आधार सक्षम पेमेंट सिस्टम

अलिकडच्या वर्षांत पर्यायी प्रमाणीकरण यंत्रणा उदयास आल्या आहेत. डिजिटल सुरक्षेसाठी अशा यंत्रणेचा वापर सुलभ करण्यासाठी, 'डिजिटल पेमेंट व्यवहारांच्या प्रमाणीकरणासाठी फ्रेमवर्क' तत्त्वावर आधारित स्वीकारण्याचा प्रस्ताव (Online Transaction Security) आहे.

आधार सक्षम पेमेंट सिस्टम (AePS) दस्तऐवजात, RBI ने AePS टचपॉईंट ऑपरेटरसाठी आधार सक्षम पेमेंट सिस्टम (AePS) ची ऑनबोर्डिंग प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. अतिरिक्त फसवणूक जोखीम व्यवस्थापन आवश्यकता देखील विचारात घेतल्या जात आहे.

Online Transaction
Mumbai Trans Harbour Link: सागरी सेतूमुळे मुंबई-नवी मुंबई प्रवास होणार सुसाट; वेगमर्यादा किती? कोणत्या वाहनांना असेल परवानगी?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com