Digital Fraud : मोदी सरकारचा डिजिटल स्ट्राइक; १.४ लाख मोबाईल नंबर ब्लॉक, ३ लाख सिम केले बंद

Financial Online Fraud News : मोदी सरकारने मोठा डिजिटल स्ट्राइक केला आहे. सरकारने डिजिटल फसवणूक नियंत्रित करण्यासाठी आतापर्यंत १.४ लाख मोबाईल नंबर ब्लॉक करण्यात आले आहेत.
Digital Fraud
Digital Fraud Saam tv
Published On

Financial Online Fraud :

मोदी सरकारने मोठा डिजिटल स्ट्राइक केला आहे. सरकारने डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी आतापर्यंत १.४ लाख मोबाईल नंबर ब्लॉक करण्यात आले आहेत. या मोबाईल नंबरचा आर्थिक फसवणुकीत वापर करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

आर्थिक सेवा विभागाचे सचिव विवेक जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सायबर सुरक्षेवर एक बैठक झाली. या बैठकीत अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस एकीकरणासाठी सायबर फसवणूक सूचना, आर्थिक संस्थांच्या विषयांवर चर्चा झाली.

Digital Fraud
Digital Orange Market: देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार, अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ठरतंय वरदान

डिजिटल सुविधांचा वापर वाढू लागला आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या घटना देखील वाढू लागल्या आहेत. हॅकर्स आणि स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्याठी नवनवीन पद्धती शोधू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारही सतर्क झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

५०० हून अधिक केल्या कारवाई

बैठकीत बँक, पोलीस आणि आर्थिक सेवा विभागाचा ताळमेळ ठेवण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत १९,७७६ नंबरला ब्लॅक लिस्टला सामावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ५०० हून अधिक कारवाई केल्या आहेत.

Digital Fraud
Digital Mahapalika News | महापालिकेचा कारभार डिजिटल होणार, महापालिकेच्या सेवेत E-Office प्रणाली

सध्या स्कॅमर्स कॉलच्या माध्यमातून डिजिटल फसवणूक करू लागले आहेत. डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी ३.०८ लाख सिम ब्लॉक करण्यात आले आहेत. तसेच ५०००० IMEI नंबर, 2194 यूआरएल ब्लॉक करण्यात आले आहे.

बैठकीत गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आलेल्या मुद्द्यांवरही चर्चा झाली. सायबर सुरक्षेतील आव्हाने आणि वाढत्या डिजिटल फसवणुकीविषयी चर्चा झाली.

'एआय'चा वापर करणार

चर्चेदरम्यान, बोगस कागदपत्रांच्या आधारे सुरु करण्यात मोबाईलल कनेक्शनची माहिती मिळवण्यासाठी ASTR नावाच्या एआय- आधारीत इंजिन विकसित करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com