Paytm च्या पेमेंट बँकेचा परवाना होणार रद्द? RBI ॲक्शन मोडमध्ये, ग्राहकांवरही होणार परिणाम

RBI Action on Paytm: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेचा ऑपरेटिंग परवाना रद्द करण्याचा विचार करत आहे. ठेवीदारांच्या सुरक्षेची खात्री केल्यानंतर निर्णय घेतला जाऊ शकतो.
RBI Action on Paytm
RBI Action on PaytmSaam Tv
Published On

RBI Action on Paytm:

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेचा ऑपरेटिंग परवाना रद्द करण्याचा विचार करत आहे. ठेवीदारांच्या सुरक्षेची खात्री केल्यानंतर निर्णय घेतला जाऊ शकतो.

पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सची पेटीएम पेमेंट्स बँकेत 49 टक्के हिस्सेदारी आहे. पेटीएम याला आपली उपकंपनी म्हणत नसून ती आपली सहयोगी कंपनी असल्याचं आतापर्यंत सांगता आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

RBI Action on Paytm
America आणि Britain मध्ये शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी! भारतीय विद्यार्थ्यांना मिळत आहे 82 लाखांची शिष्यवृत्ती; असा करा अर्ज

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, आरबीआय पुढील महिन्याच्या सुरुवातीला परवाना रद्द करण्याची घोषणा करू शकते. याचा अर्थ असा की परवाना रद्द झाल्यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकेचे अस्तित्व संपुष्टात येईल. दरम्यान, आरबीआयने आधीच जाहीर केले आहे की, 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या बहुतांश सेवा बंद होतील. दरम्यान, मॉर्गन स्टॅनलीने शुक्रवारी खुल्या बाजारातून One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडमध्ये सुमारे 244 कोटी रुपयांचा नाममात्र 0.8% हिस्सा विकत घेतला आहे.  (Latest Marathi News)

विजय शेखर शर्मा यांनी दिलं स्पष्टीकरण

याआधी One97 कम्युनिकेशन्स लिमिटेड (ओसीएल) सीईओ विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयच्या कारवाईबाबत स्पष्टीकरण दिले होते. डिजिटल पेमेंट आणि सेवा ॲप पेटीएम काम करत असून 29 फेब्रुवारीनंतरही ते नेहमीप्रमाणे काम करत राहील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. शर्मा म्हणाले होते की, पेटीएम वापरणाऱ्या सर्व लोकांसाठी तुमचे आवडते ॲप सुरू आहे आणि 29 फेब्रुवारीनंतरही असेच काम करत राहील.

RBI Action on Paytm
Andheri Gokhale Bridge: अंधेरीतील नागरिकांसाठी खुशखबर! गोखले पूल फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वाहतुकीसाठी होणार खुला

आरबीआयने काय केली कारवाई?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बुधवारी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला 29 फेब्रुवारी 2024 नंतर कोणत्याही ग्राहक खाते, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट, वॉलेट आणि फास्टॅगमध्ये ठेवी किंवा टॉप-अप स्वीकारू नयेत, असे निर्देश दिले आहेत. तेव्हापासून कंपनीचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत. सलग 2 दिवस स्टॉकमध्ये 20 टक्के लोअर सर्किट होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com