America आणि Britain मध्ये शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी! भारतीय विद्यार्थ्यांना मिळत आहे 82 लाखांची शिष्यवृत्ती; असा करा अर्ज

Study Abroad:अमेरिका, ब्रिटन किंवा युरोपमध्ये शिक्षण घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र अनेकांचं हे स्वप्न पैशाअभावी पूर्ण हात नाही. आता हुशार विद्यार्थ्यांसाठी अशा अनेक शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत.
Inlaks Shivdasani Scholarships
Inlaks Shivdasani ScholarshipsSaam Tv
Published On

Inlaks Shivdasani Scholarships:

अमेरिका, ब्रिटन किंवा युरोपमध्ये शिक्षण घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र अनेकांचं हे स्वप्न पैशाअभावी पूर्ण हात नाही. आता हुशार विद्यार्थ्यांसाठी अशा अनेक शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत, ज्याद्वारे ते परदेशातील उच्च संस्थांमध्ये शिक्षण घेऊ शकतात. भारतीय विद्यार्थ्यांसाठी अशीच एक शिष्यवृत्ती आहे, जिचे नाव आहे Inlaks Shivdasani Scholarships. ही शिष्यवृत्ती इनलॅक्स शिवदासानी फाऊंडेशनद्वार दिली जाते.

इनलॅक्स शिवदासानी शिष्यवृत्ती भारतीय विद्यार्थ्यांनाअमेरिका, ब्रिटन किंवा युरोपमधील सर्वोच्च संस्थांमध्ये मास्टर्स, एमफिल किंवा डॉक्टरेट पदवी मिळवण्यासाठी दिली जाते. ही शिष्यवृत्ती 1976 पासून विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. फाउंडेशनच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी 6 फेब्रुवारीपासून अर्ज करू शकतात. यासाठी नोंदणीची शेवटची तारीख 22 मार्च आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Inlaks Shivdasani Scholarships
Central Government Schemes: झोपडपट्ट्या आणि अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्यांना मिळणार स्वतःचं घर, सरकार आणणार योजना; अर्थमंत्र्यांनी केली घोषणा

इनलॅक्स शिवदासानी शिष्यवृत्ती अंतर्गत भारतीय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक लाख यूएस डॉलर (सुमारे 82 लाख 97 हजार रुपये) मिळतात. या शिष्यवृत्तीमध्ये राहण्याचा खर्च, आरोग्यसेवा आणि एक बाजूचा विमान खर्च समाविष्ट आहे. इनलॅक्स शिवदासानी यांची इम्पीरियल कॉलेज, लंडन, रॉयल कॉलेज ऑफ आर्ट (RCA), लंडन, केंब्रिज विद्यापीठ (केंब्रिज ट्रस्ट), पॅरिस, किंग्ज कॉलेज लंडन (पीएचडी विद्यार्थ्यांसाठी) आणि हर्टी यांच्यासोबत संयुक्त शिष्यवृत्ती व्यवस्था आहे.  (Latest Marathi News)

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

पासपोर्ट, रेझ्युमे, फोटो, ऑफर लेटर फी स्टेटमेंट अतिरिक्त फंडिंग पदवी प्रमाणपत्राचा पुरावा आणि मार्कशीट कोर्स-संबंधित पोर्टफोलिओ/लिंक/लेखन नमुने TOEFL/IELTS/GRE स्कोअर शीट शैक्षणिक भेद, अनुदान, शिष्यवृत्ती इ. बद्दल माहिती.

Inlaks Shivdasani Scholarships
Andheri Gokhale Bridge: अंधेरीतील नागरिकांसाठी खुशखबर! गोखले पूल फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वाहतुकीसाठी होणार खुला

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट

  • रेझ्युमे

  • सीव्ही

  • फोटो प्रवेश

  • फी स्टेटमेंट

  • पदवी प्रमाणपत्र आणि मार्कशीट

  • कोर्स संबंधित पोर्टफोलिओ

  • GRE स्कोअर शीट

  • इतर शिष्यवृत्ती इत्यादींबद्दल माहिती.

शिष्यवृत्तीसाठी पात्रता

  • उमेदवाराचा जन्म १ जानेवारी १९९४ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. तसेच एखाद्या भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.

  • तुम्ही परदेशी विद्यापीठातून पदवी प्राप्त केली असेल, तर पदवीनंतर तुम्ही किमान दोन सलग वर्षे भारतात राहिले असावेत.

  • सामाजिक विज्ञान, कायदा, ललित कला, आर्किटेक्चर आणि संबंधित विषयांतील उमेदवारांना पदवीमध्ये किमान 65 टक्के, CGPA 6.8/10, किंवा GPA 2.6/4 शैक्षणिक ग्रेड असणे आवश्यक आहे.

  • शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित शिक्षण संस्थेत प्रवेश घेतलेला असावा. प्रवेशाच्या पुराव्याशिवाय शिष्यवृत्ती अर्जांचा विचार केला जाणार नाही.

  • उमेदवारांनी TOEFL किंवा IELTS सारखी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. पात्रतेबाबत अधिक माहितीसाठी, इनलॅक्स शिवदासानी शिष्यवृत्ती पोर्टल www.inlaksfoundation.org/scholarships/ ला भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com