Ram Mandir Online Prasad: भक्तांच्या आनंदावर विरजन! 'ऑनलाइन प्रसाद' अद्याप उपलब्ध नाही, राम मंदिर ट्रस्टची माहिती

Ram Mandir News: श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने अद्याप भक्तांसाठी 'प्रसाद' मिळवण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार केलेला नाही. ऑनलाइन वितरणासाठी ट्रस्टने कोणत्याही विक्रेत्याची नियुक्ती केलेली नाही. भक्तांना अनधिकृत ऑनलाइन प्लॅटफॉर्मपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Ram Mandir Ayodhya
Ram Mandir AyodhyaSaam Digital

Ram Mandir Trust Informs

मागील काही दिवसांपासून राम मंदिर अभिषेक सोहळ्याचा प्रसाद ऑनलाईन थेट घरापर्यंत पोहोचणार, अशी माहिती मिळतेय. त्यामुळे भक्तवर्गात मोठा आनंद देखील पाहायला मिळत आहे. पण, आता भक्तांच्या याच आनंदावर विरजन पडतंय. राम मंदिर (Ram Mandir) ट्रस्टने या ऑनलाईन प्रसादाबद्दल मोठा खुलासा केलाय. आपण त्याबाबत सविस्तर जाणून घेवू या.

प्रसादाचं ऑनलाइन वितरण

श्री रामजन्मभूमी (Ayodhya) तीर्थ क्षेत्र ट्रस्टने ऑनलाईन प्रसाद वितरणासाठी कोणताही प्लॅटफॉर्म अजून तयार केलेला नाही. ट्रस्टने प्रसादाचे ऑनलाइन वितरण करण्यासाठी कोणताही विक्रेता किंवा एजन्सी नियुक्त केलेली नाही, अशी माहिती ट्रस्टने दिली. भक्तांमधील ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे प्रसाद खरेदी करण्यासाठी हाणामारी होत असल्याची माहिती ट्रस्टच्या एका सदस्याने दिलीय.

मुंबईचे रहिवासी अनिल परांजपे यांनी बुधवारी राम मंदिर ट्रस्ट कार्यालयाशी संपर्क साधला. ते म्हणाले की, काही ऑनलाइन प्लॅटफॉर्म प्रसाद देत आहेत. याची खात्री करण्यासाठी आणि प्रसाद घेण्यासाठी मी ट्रस्टच्या कार्यालयात गेलो. राम मंदिराजवळील ट्रस्टच्या कॅम्प ऑफिसमध्ये नेमलेल्या कर्मचार्‍यांनी 'इलायची दाना'ची 10 पाकिटे परांजपे यांना दिली. पुढील वाटपासाठी त्या इतर प्रसादात मिसळा, अशा सूचना दिल्या.

इतर मंदिरे आणि धार्मिक तीर्थस्थानांप्रमाणे अयोध्येतही भाविकांना (Ram Mandir) प्रसाद दिला जातोय. परंतु, अयोध्येत (Ayodhya) सुरक्षा चौक्यांच्या पलीकडे प्रसाद घेऊन जाण्यास सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाही. मंदिर ट्रस्ट कॅम्प ऑफिसचे प्रभारी प्रकाश गुप्ता म्हणाले, राम मंदिर ट्रस्ट ही एक ना-नफा संस्था आहे. सध्या फक्त राम मंदिरातच भक्तांना प्रसाद दिला जातोय. आतापर्यंत प्रसाद वाटपासाठी कोणतीही ऑनलाइन सेवा सुरू केलेली नाही.

Ram Mandir Ayodhya
Ram Mandir Ayodhya: मोठी बातमी! श्रीरामाची मूर्ती अयोध्येकडे रवाना, अवघा देश राममय

राम मंदिराच्या नावाखाली भाविकांची फसवणूक

हा प्रसाद भाविकांना मोफत दिला जातोय. यासाठी कोणतेही पैसे आकारले जात नाहीत. लोकांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि सेवांबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण ट्रस्टने अद्याप ऑनलाईन प्रसाद वाटपासाठी कोणालाही अधिकृत केले नाही.

मागील काही दिवसांपासून राम मंदिराच्या (Ram Mandir) नावाखाली भाविकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होतेय. मागे रामप्रभुंचा फोटो असलेली पाचशेची एक नोट सोशल मिडियावर व्हायरल होतेय, तर २२ तारखेला ती लॉंच केली जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण ही देखील अफवाच असल्याचं स्पष्ट झालंय.

Ram Mandir Ayodhya
Ayodhya News | अयोध्येत 70 वर्षांपासून प्रसाद पुरवणारं एकमेव दुकान!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com