Renault Duster: १२ वर्षापूर्वी मार्केट जाम करणारी कार कमबॅकसाठी सज्ज, नव्या रुपात घेणार एन्ट्री

Renault Duster: रेनॉल्ट ही वाहन उत्पादन कंपन्यांमधील नावाजलेली कंपनी आहे. कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी नवनवीन कार लॉंच करत असते.
Renault Duster
Renault DusterSaam Digital
Published On

12 years Ago Is Ready For Comeback

रेनॉल्ट ही वाहन उत्पादन कंपन्यांमधील नावाजलेली कंपनी आहे. कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी नवनवीन कार लॉंच करत असते. अशातच फ्रान्सची आघाडीची कार निर्मिती कंपनी असलेल्या रेनॉल्टने १२ वर्षापूर्वी भारतीय बाजारात'नवीन SUV'Renault Duster' पहिल्यांदा लॉंच केले होती. काही काळानंतर कंपनीने आलेल्या अपयशातून आपल्या कारमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. आता पुन्हा एकदा रेनॉल्ट डस्टरसोबत बाजाराच होणार आहे. सध्याच कंपनीने जागतिक बाजारात आपले नवीन डस्टरचे अनावरण केले आहे,असे सांगितले जात आहे की कंपनी ते पुन्हा भारतीय बाजारात नवीन अवतारात लॉन्च करू शकते.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Renault Duster
Business Idea In Marathi: अवघ्या २० हजार रुपयांच्या भांडवलात सुरु करा व्यवसाय; होईल तगडी कमाई, जाणून घ्या

रेनॉल्टने भारतीय बाजारात ४ जुलै २०१२ रोजी पहिल्यांदा आपले नवीन डस्टर कार लॉंच केले होते. ही SUV बाजारात आणण्यापूर्वी कंपनीने २०११ मध्ये Fluence Sedan सह रेनॉल्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आपला प्रवास सुरु केला. यानंतर या कंपनीने कोलिओस एसयूव्ही आणि पल्स हॅचबॅक या लॉंच केल्या मात्र या गाड्यांना पाहिजे तसे यश मिळाले नाही.

ग्राहकांची पसंत

Renault Duster कंपनी भारतात येण्यापूर्वीची त्याची एक वेगळीच गोष्ट आहे. या कंपनीने अपयशानंतर भारतीत लोकांची कारबाबतची आवड लक्षात केली त्यानुसार सर्वेक्षण करण्यात आले आणि भारतीय ग्राहकाला काय हवे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला,त्यानुसार आपल्या कंपनीच्या कारसंबंधित बजेट ,मेंटनेंस ,लुक तसेच कारचे डिजाईन यावर लक्ष केंद्रित केले. यानंतर कंपनीने आपल्या डस्टरमध्ये सुमारे ४१ लहान मोठे बदल करून भारतीय ग्राहकांनुसार जागतिक बाजारपेठेत नवीन कार उपलब्ध केली. परंतू त्यावेळी कारसाठी असे संशोधन करणे सोपे नव्हते परंतु ज्या वाहनासाठी हे संशोधन केले जात होते ती देखील सामान्य एसयूव्ही नव्हती. 

मायलेज सुधारणा

भारतीय खरेदीदारांमध्ये मायलेज हा नेहमीच प्रथम प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न असतो. ग्राहकांची गरज लक्षात ठेवता या कंपनीने चांगल्या कामगिरीसह,SUV सुमारे १९ ते २० किमी प्रति लिटर मायलेज देते. इंजिनचे रिट्यूनिंग खास पॅरिसमध्ये करण्यात आले आणि इंजिन हे थेट फाईन-ट्यून करुन भारतात पाठवले गेले.2011 मध्ये, कंपनीने नवी दिल्ली येथे एक कार्यक्रम आयोतिक केला होतो त्यामध्ये भारतीय वैशिष्ट्य रेनॉल्ट डस्टर प्रथमच प्रोटोटाइप म्हणून सादर केले गेले. या कार्यक्रमाला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आणि आवश्यक बदल यानंतर अखेर डस्टर सुरू करण्याची योजना आखण्यात आली.

शोधनानंतर अनेक बदल आणि फीडबॅकच्या लांबलचक यादीनंतर रेनॉल्टने जानेवारी २०१२ मध्ये भारतीय ग्राहकांना डस्टर सादर केले. यानंतर २०१२जुलैमध्ये कंपनीने संपूर्ण भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले. Renault Duster ने बाजारात येताच ग्राहकांच्या मोठ्या पसंतीस आवी. या SUV ने सुमारे २९ पुरस्कार जिंकले.ज्यात २०१२ ची इंडियन कार ऑफ द इयर (ICOTY) देखील समाविष्ट होती.

डस्टरच या कंपनीचे हे यश इतके जबरदस्त होते की लॉन्च केल्याच्या एका वर्षातच डस्टरने २३% मार्केट शेअर मिळवले. रेनॉल्टच्या एकूण उत्पादनात डस्टरचा वाटा ८६%, तर त्याच्या विक्रीत ८१% आणि निर्यातीत १००% वाटाआहे. बाजारात डस्टरची मागणी इतकी वाढली होती की कंपनीला लॉन्च झाल्यानंतर एका वर्षातच तिप्पट उत्पादन करावे लागले. परंतू काही काळानंतर अनेक नवीन मॉडेल्स डस्टरचे प्रतिस्पर्धी म्हणून आले आणि २०२२ मध्ये कंपनीने शेवटी ते बंद केले.

डस्टर मोठे पुनरागमन

पण पुन्हा एकदा Renualt Dusterच्या कमबॅकसाठी तयारी केली जात आहे आणि यावेळी कंपनीने त्याचा लूक आणि डिझाईन पूर्वीपेक्षाही चांगला बनवला आहे. अलीकडेच त्याची काही अधिकृत फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये बरेच काही बदलले आहे. मीडिया रिपोर्ट्सवरनुसार पुढच्या वर्षी डस्टर भारतीय बाजारात नव्या अवतारात दिसणार आहे. सध्या, रेनॉल्ट इंडियाच्या पोर्टफोलिओमध्ये Kwid, Kiger आणि Triber यासह एकूण 3 मॉडेल्सचा समावेश आहे. 

Renault Duster
Business Idea In Marathi: नोकरी सोडा अन् ५० हजारात सुरु करा व्यवसाय; लाखोंची होईल कमाई, जाणून घ्या सविस्तर माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com