Car Discounts: होंडाच्या कारवर मिळतोय १.२० लाखापर्यंत डिस्काउंट, फेब्रुवारी महिन्यात खास ऑफर

Honda Car Discounts : फेब्रुवारी महिन्यात होंडाच्या काही कारवर जबरदस्त डिस्काउंट देण्यात आले आहेत.
Honda Car Discounts
Honda Car Discounts Saam Tv

Honda Car Discounts In February 2024:

प्रत्येकाचे कार घेण्याचे स्वप्न असते. कार घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बजेट. आपल्या बजेटमध्ये चांगली कार खरेदी करता यावी असे सर्वांनाच वाटते. यासाठी कंपनी नेहमीच वेगवेगळे डिस्काउंट आणि ऑफर देत असते. फेब्रुवारी महिन्यात तुम्ही कार घ्यायचा विचार करत असाल तर होंडाच्या कार कारवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. होंडाच्या कारवर किती डिस्काउंट मिळत आहे याबद्दल जाणून घेऊया. (Latest News)

Honda Amaze

होंडाच्या कारवर कंपनीने जबरदस्त डिस्काउंट दिले आहे. Honda Amaze कारवर ३०,००० कॅश डिस्काउंट, १५,००० रुपये एक्सचेंज बोनस आणि २०,००० रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट मिळणार आहे. तसेच तुम्हाला ४,००० रुपयांचा लॉयलटी बोनस मिळू शकतो.

कारच्या M24 व्हेरियंटसाठी ग्राहकांना २०,००० रुपयांचा कॅश डिस्काउंट किंवा २४,३४६ रुपयांच्या फ्रि अॅक्सेसरीज घेण्याची ऑफर देण्यात आली आहे. तसेच १०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि २३,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात आली आहे.

Honda Car Discounts
Gold Silver Rate (9th February 2024): सोन्याचा भाव गडगडला, चांदीच्या दरात उसळी, जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

Honda City

होंडा सिटी सेडानवर या महिन्यात जवळपास १.१२ लाख रुपयांपर्यंत सवल मिळणार आहे. ज्या सेडान कार जानेवारी महिन्यात तयार केल्या आहेत. त्यावर १५,००० रुपयांचा कॅश डिस्काउंट किंवा १६,२९६ रुपयांची फ्री अॅक्सेसरीज घेण्याची ऑफर देण्यात आली आहे. तसेच ग्राहक १०,०० रुपयांचा एक्सचेंज बोनसचा लाभ घेऊ शकतात.

टीप- या सर्व मॉडेलवरील डिस्काउंट राज्यानुसार बदलत असतो. तसेच या ऑफरसाठी तुम्हाला जवळच्या कार डिलरशी संपर्क साधावा लागेल. त्यांच्याकडील उपलब्ध असलेल्या डिस्काउंटवर तुम्ही कार खरेदी करु शकतात.

Honda Car Discounts
Disney Hotstar: नेटफ्लिक्सनंतर डिस्ने प्लस हॉटस्टारचा मोठा निर्णय; पासवर्ड शेअर करण्यासाठी द्यावे लागणार जास्त पैसे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com