Honda Diesel Cars in India : होंडा अमेज सोबत इतर अनेक मॉडेल्स होणार बंद; कंपनीनं दिलं 'हे' कारण

Honda Cars आधीच भारतात टिकून राहण्यासाठी संघर्ष करत आहे.
Honda Diesel Cars in India
Honda Diesel Cars in IndiaSaam Tv
Published On

Honda Diesel Cars in India : नुकतेच सुरु असलेले Auto Expo मध्ये अनेक कंपन्यांनी आपल्या नव्या कारचे प्रदर्शन केले आहे. काही कंपन्यांच्या कार या अगदी वाजवी दरात असून त्याचे मॉडेल देखील दमदार आहे.

Honda Cars आधीच भारतात टिकून राहण्यासाठी संघर्ष करत आहे. दरम्यान, कंपनीसाठी आणखी एक वाईट बातमी आली आहे. कंपनीला आपल्या सर्वात स्वस्त कारचे डिझेल मॉडेल बंद करावे लागले आहे. ही Honda Amaze कार आहे, जी कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी कार देखील आहे.

Honda Diesel Cars in India
Auto Expo 2023 : TVS iQube ST व्हेरियंटचे ऑटो एक्स्पोमध्ये दमदार पदार्पण, भारतात होणार लवकरच लॉन्च !

कंपनीने अधिकृतपणे अमेझ डिझेल मॉडेल आपल्या वेबसाइटवरून काढून टाकले आहे. डिझेल इंजिन देणारी कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमधील ही एकमेव कार होती. या विभागात Honda Amaze, Hyundai Aura, Tata Tigor आणि Maruti Suzuki Dzire यांचा समावेश आहे.

1. बंद करण्याचे कारण काय?

  • कंपनींने सांगितले की, रिअल ड्रायव्हिंग एमिशन (RDE) नियम भारतात (India) एप्रिल 2023 पासून लागू होणार आहेत.

  • यामुळेच कंपनीने अमेझचे डिझेल इंजिन बंद केले आहे.

  • यामध्ये नवीन पद्धतीने डिझेल इंजिन अपग्रेड करावे लागतील, जे खूप महाग आहे. शिवाय या विभागात डिझेलची मागणीही फारशी नव्हती. अशा स्थितीत कंपनी बंद करण्याचा एकच मार्ग उरला होता.

Honda Diesel Cars in India
Honda Diesel Cars in IndiaCanva

2. हे मॉडेल्सही बंद होतील

  • होंडाचे सध्या भारतात आणखी दोन डिझेल मॉडेल्स आहेत. या Honda WR-V आणि 5th gen City आहेत.

  • या दोन्हीही लवकरच टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील आणि कंपनी फेब्रुवारी 2023 पासून डिझेल इंजिनचे उत्पादन बंद करेल.

  • आता Honda Amaze फक्त 1.2-लीटर i-VTEC पेट्रोल इंजिनसह उपलब्ध असेल.

  • Amaze ची किंमत 6.89 लाख ते 9.48 लाख रुपये (एक्स-शोरूम, भारत) दरम्यान आहे.

  • Honda ने प्रथम 1.5-लिटर डिझेल इंजिन अमेझ सह भारतात सादर केले. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह 100hp आणि 200Nm टॉर्क जनरेट करते.

  • CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्यायही आहे. यामुळे अमेझ ही त्याच्या विभागातील एकमेव डिझेल ऑटोमॅटिक कॉम्पॅक्ट सेडान बनली.

  • होंडा आता एका एसयूव्हीवर काम करत आहे, ज्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.

  • ही Honda SUV 2023 च्या सणासुदीच्या (Festival) हंगामात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com