Business Idea In Marathi: नोकरी सोडा अन् ५० हजारात सुरु करा व्यवसाय; लाखोंची होईल कमाई, जाणून घ्या सविस्तर माहिती

Business Idea In Marathi information: तुमची नोकरी करण्याची प्रबळ इच्छा असेल, तर तुम्ही ५०००० रुपयांच्या भांडवलातही चांगला व्यवसाय करू शकता. व्यवसाय करु इच्छिणाऱ्यांसाठी आम्ही भन्नाट आयडिया घेऊन आलो आहोत.
How To Start business
How To Start business saam tv

Business Idea under 50 thousand:

भारत देशाला तरुणांचा देश म्हटलं जातं. देशातील काही तरुण व्यवसाय करण्यासाठी इच्छुक आहेत. काही तरुण नोकरी सोडूनही व्यवसाय करण्याचा विचारात आहेत. मात्र, नोकरी सोडून व्यवसाय सुरु करणे, तितकेच आर्थिक जोखमीचे आहे. पण तुमची नोकरी करण्याची प्रबळ इच्छा असेल, तर तुम्ही ५०००० रुपयांच्या भांडवलातही चांगला व्यवसाय करू शकता. व्यवसाय करु इच्छिणाऱ्यांसाठी आम्ही भन्नाट आयडिया घेऊन आलो आहोत. (Latest Marathi News)

कपडे विक्रीचा व्यवसाय

भारत देशाला उत्सवप्रिय देश म्हटलं जातं. नव्या कपड्याशिवाय एखादा सण अपुरा म्हटलं तरी हरकत नाही. त्यामुळे एखादा सण आला की, तुम्ही नवे कपडे खरेदी करण्याचा विचार करू लागतात. काही जण प्रत्येक वर्षाला नवीन कपडे खरेदी करतात.

लग्न समारंभाच्या वेळी कपडे खरेदी जोरात सुरु असते. देशातील कानाकोपऱ्यात प्रत्येक महिन्याला एखादा तरी सण साजरा केला जातो. या सणांमुळे लोकांकडून कपड्यांना मोठी मागणी असते. या कपड्यांचा व्यवसाय ५०००० रुपयांपेक्षा कमी भांडवलात सुरु करू शकता. कपड्यांचा व्यवसाय भारतातील यशस्वी व्यवसाय मानला जातो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

How To Start business
Business Idea In Marathi : चमचमीत पदार्थ बनवता येताय? मग महिन्याला कमवू शकता लाखो रुपये; फक्त १० हजार रुपयांची गुंतवणूक करा

लोणचे विक्री

कमी भांडवलात लोणचे विक्री करण्याचा व्यवसाय चांगला कमाई मिळवून देणारा ठरू शकतो. देशातील बहुतेक लोकांना जेवण करताना लोणचे लागते. भारतातील प्रत्येक घरात एका प्रकारचं तरी लोणचं असतंच. तुम्हाला कमी भांडवलात व्यवसाय करायचा असेल,तर लोणचे तयार करून विक्री करणे बेस्ट ठरेल. बाजारात लोणच्याला मोठी मागणी असते. लोणचे विक्री करण्याचा व्यवसाय कोणीही करु शकतो.

How To Start business
Business Ideas In Marathi: सुशिक्षित बेरोजगारांसाठी ५ बिझनेस आयडिया; दर महिन्याला कराल लाखोंची कमाई, वाचा

ऑनलाइन शिकवणी घेणे

तुम्ही उच्चशिक्षित असाल, तर ऑनलाइन शिकवणीचा व्यवसाय सुरुच राहील. शिकवणी घेणे हा उत्तम व्यवसाय आहे. तुम्ही भरपूर कमी गुंतवणुकीतून या व्यवसायाची सुरुवात करू शकता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी फक्त एखादी रिकामी खोली लागेल. तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉप/कॉम्प्युटरच्या सहाय्याने ऑनलाइन शिकवणी घेऊ शकता. तसेच या शिकवणीसाठी विद्यार्थिक ठराविक फी आकारू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com