Business Ideas In Marathi: सुशिक्षित बेरोजगारांसाठी ५ बिझनेस आयडिया; दर महिन्याला कराल लाखोंची कमाई, वाचा

Business Ideas In Marathi: सध्याच्या आर्थिक युगात पैसाच सर्व काही आहे, असं बोललं जातं. पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. काही नोकरीच्या माध्यमातून पैसे कमावतात, तर काही व्यवसायातून पैसे कमावतात.
money
money Saam Tv
Published On

Business Ideas In Marathi २०२३:

सध्याच्या आर्थिक युगात पैसाच सर्व काही आहे, असं बोललं जातं. पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. काही नोकरीच्या माध्यमातून पैसे कमावतात, तर काही व्यवसायातून पैसे कमावतात. तुम्हाला व्यवसायातून कमाई करायची असेल, तर तुमच्यासाठी पाच जबरदस्त बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत. (Latest Marathi News)

कोरोना विषाणूच्या महामारीनंतर अनेक लोकांकडून व्यवसायाला पसंती मिळू लागली आहे. तुम्ही संगणक दुरुस्ती, घरगुती शिकवणी अशा नानाविविध पद्धतीतून कमाई करू शकतात.

money
Narayana Murthy: 'मी स्वत: आठवड्याला ८५ ते ९० तास काम केलंय'; नारायण मूर्तींचं कामाच्या तासांवरील वक्तव्य पुन्हा चर्चेत

१. मोबाईल, संगणक दुरुस्ती करणे

सध्या सर्व कामे ऑनलाइन होऊ लागली आहेत. सध्या मोबाईल, लॅपटॉप, संगणक याची मागणी वाढली आहे. ज्या लोकांना मोबाईल, लॅपटॉप दुरुस्ती जमते. त्यांचासाठी घरबसल्या कमाईची सुवर्ण संधी आहे. मोबाईल, संगणक दुरुस्ती करण्यास जास्त वस्तूही लागत नाहीत. मोबाईल आणि संगणक दुरुस्तीसाठी काही ठराविक वस्तूंची गरज लागते.

ब्लॉगमधून कमाई

तुम्हाला लिखानाची आवड असते. तुम्ही ब्लॉगिंग करून लाखोंची कमाई करू शकतात. तुम्हाला लाखो लोकांपर्यंत पोहोचून ब्लॉगिंग करायची असेल तर त्यासाठी वेबसाइट बनवावी लागेल. या माध्यमातून काही महिन्यातच चांगली कमाई करू शकतात. ज्या विषयावर तुम्हाला लिहायचं आहे, त्या विषयाची सखोल माहिती असायला हवी.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

युट्यूबच्या माध्यमातून कमाई

युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही लाखोंची कमाई करू शकतात. तुम्हाला कॅमेरासमोर बोलायला भीती वाटत नाही. तर तुम्ही दिवसाला व्हिडिओ तयार करून लाखो रुपयांची कमाई करू शकतात. यासाठी तुम्हाला एक युट्यूब चॅनल तयार करावं लागतं. त्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडिओ शेअर करून माहिती देऊ शकतात.

घरगुती शिकवणी

तुम्ही घरगुती शिकवणी घेऊन लाखो रुपयांची कमाई करू शकतात. यासाठी तुम्हाला अनेक विषयांचा चांगला अभ्यास असायला हवा. तुम्ही तुमच्या घरातल्या घरात शिकवणी वर्ग सुरु करू शकतात. घरातील शिकवणीतील विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास तुम्ही आणखी शिक्षक कामावर ठेवू शकता.

money
Business Ideas In Marathi: भांडवल ४ हजार, महिन्याला कमाई १ लाख; तरुणी अवघ्या २ महिन्यात झाल्या मालामाल

भाषांतर

भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. अनेक लोक जगातील अनेक भाषा शिकू इच्छित आहे. तुम्हाला न समजणारी भाषा समजून घेण्यासाठी अनुवादकाची गरज असते. अनेक ठिकाणी इंग्रजीतील मजकूर हिंदी, मराठी भाषांत भाषांतर करण्याची गरज भासते. भाषांतर करून तुम्ही चांगली कमाई करू शकतात .

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com