Narayana Murthy: 'मी स्वत: आठवड्याला ८५ ते ९० तास काम केलंय'; नारायण मूर्तींचं कामाच्या तासांवरील वक्तव्य पुन्हा चर्चेत

Narayana Murthy Statement: नारायण मूर्ती यांच्या विधानानंतर कामाच्या तासांवर एकच चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर आता नारायण मूर्ती यांनी मी आठवड्याला ८५ ते ९० तास काम केलं असल्याचं वक्तव्य केलं आहे.
Narayana Murthy
Narayana MurthySaam Tv
Published On

Narayana Murthy Statement On Working Hours:

प्रसिद्ध उद्योजक नारायण मूर्ती यांनी गेल्या महिन्यात युवकांनी आठवड्याला ७० तास काम करायला हवं. ज्यामुळे देशाची प्रगती होईल, असं म्हटलं होतं. नारायण मूर्ती यांच्या विधानानंतर कामाच्या तासांवर एकच चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर आता नारायण मूर्ती यांनी मी आठवड्याला ८५ ते ९० तास काम केलं असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. (Latest Marathi News)

वृत्त संस्था आयएएनसच्या वृत्तानुसार, नारायण मूर्ती यांनी गेल्या महिन्यात देशाची उत्पादकता वाढविण्यासाठी भारतीय युवकांनी ७० तास काम करायला हवं असं म्हटलं होतं.

'मी सकाळी ६.२० वाजता ऑफिसला यायचो..'

७७ वर्षीय नारायण मूर्ती यांनी 'द इकोनॉमिक टाइम्स' ला मुलाखत देताना म्हटलं की, 'मी सकाळी ६.२० वाजता ऑफिसला यायचो. त्यानंतर रात्री ८.३० वाजता घरी जायचो. आठवड्यातून ६ दिवस काम करायचो. मला माहीत आहे की, जो देश समृद्ध झाला आह, तो त्यांच्या मेहनतीमुळे झाला आहे'.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Narayana Murthy
Petrol Diesel Rate Today (10 December) : मुंबई-पुण्यासह नागपूरात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर? महाराष्ट्रात आजचा भाव किती?

'मी संपूर्ण ४० वर्षांच्या काळात काम करत असताना आठवड्याला ६० तास काम केलं आहे. १९९४ साली आठवड्यातील ६ दिवस कामावर यायचो. मी आठवड्याला कमीत कमी ८५ ते ९० तास काम करायचो, असं नारायण मूर्ती यांनी सांगितलं.

Narayana Murthy
ऑफिसमधून घरी आल्यावर पून्हा Mood Refresh कसा कराल? या टिप्स फॉलो करा

नारायण मूर्ती यांनी युवकांना काय सल्ला दिला होता?

ऑक्टोबर महिन्यात नारायण मूर्ती यांच्या आठवड्यातील कामाच्या तासांवर एकच चर्चा सुरु झाली होती. त्यांनी म्हटलं होतं की,' देशातील युवकांनी आठवड्याला ७० तास काम करायला हवे. त्यामुळे भारत अर्थव्यवस्थेत प्रगत असणाऱ्या देशांसोबत स्पर्धा करू शकतो. ज्या काही देशांना गेल्या दोन ते तीन दशकांत यश मिळालंय'.

'भारताची कामाची उत्पादकता जगाच्या तुलनेने कमी आहे. या बाबतीत चीन पुढे आहे. त्यामुळे तरुणांनी अतिरिक्त तास काम करायला हवं, याप्रकारे दुसऱ्या महायुद्धानंतर कामाची उत्पादकता जपान आणि जर्मनीने वाढवली होती, असं नारायण मूर्ती म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com