RBI चा Paytm युजर्सला मोठा दिलासा! आता या तारखेपर्यंत वापरू शकता पेटीएम पेमेंट बँक

RBI On Paytm: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेटीएमशी संलग्न वन 97 कम्युनिकेशन्स किंवा पेटीएम पेमेंट्स बँक बंद करण्याची अंतिम मुदत 15 मार्चपर्यंत वाढवली आहे.
RBI on Paytm
RBI on PaytmSaam Tv

Paytm Payments Bank News:

पेटीएम पेमेंट्स बँक वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेटीएमशी संलग्न वन 97 कम्युनिकेशन्स किंवा पेटीएम पेमेंट्स बँक बंद करण्याची अंतिम मुदत 15 मार्चपर्यंत वाढवली आहे. यामुळे पेटीएम पेमेंट्स बँक युजर्सला मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, आरबीआयने जानेवारीमध्ये एका आदेशात पेटीएमला 29 फेब्रुवारीपासून त्यांच्या खात्यात किंवा वॉलेटमध्ये कोणत्याही नवीन ठेवी स्वीकारणे बंद करण्यास सांगितले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

RBI on Paytm
Prakash Ambedkar: मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका, प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा

आरबीआयने म्हटले होते की, सततच्या आणि गंभीर पर्यवेक्षकांच्या चिंतेमुळे ही कारवाई सुरू करण्यात आली. या आठवड्याच्या सुरुवातीला केंद्रीय तपास यंत्रणेनेही पेटीएमच्या परदेशी व्यवहारांच्या तपशीलांची तपासणी करण्यास सुरुवात केली. (Latest Marathi News)

आरबीआयने म्हटले आहे की, ते व्यापाऱ्यांसह ग्राहकांचे हित लक्षात घेऊन अंतिम मुदत वाढवत आहे. ज्यांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आणखी काही वेळ हवा आहे, त्यांना याची मदत होईल.

RBI on Paytm
Government Schemes: परदेशी शिष्यवृत्ती, मुलींसाठी विनामूल्य वसतिगृह; मराठा समाजासाठी शासनाच्या विविध योजना

याबाबत आरबीआयने एक अधिसूचना जारी केली आहे. यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, 15 मार्च 2024 नंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात, प्रीपेड डिव्हाइस, वॉलेट, फास्टॅग, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड, इत्यादींमध्ये पुढील कोणत्याही ठेवी किंवा क्रेडिट व्यवहार किंवा टॉप अपला परवानगी दिली जाणार नाही. यासोबतच आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर आपल्या आदेशाच्या परिणामाबद्दल FAQ देखील जारी केले आहे. ज्यात पेटीएमच्या संदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तर देण्यात आली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com