मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असून त्यांच्यावर विष प्रयोगाची शक्यता नाकारता येत नाहीये, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. अकोल्यात बोलताना ते असं म्हणाले आहेत.
मनोज जरांगे यांना दिली जाणारी औषधं, जेवण, इंजेक्शन आणि सलाईन हे सर्व तपासूनच द्यावीत, अशी मागणी आंबेडकरांनी सरकारकडे केली आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला काही लोकांपासून धोका आहे. मात्र, याच्यामागे नेमकं कोण आहे, ते सांगणार नाहीये?, असं आंबेडकरांनी म्हटलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जरांगे यांच्यामुळे अनेकांचं राजकीय भवितव्य धोक्यात आल्याने त्यांच्या घातपाताची शक्यता आहे. त्यामुळ त्यांना दिले जाणारे जेवण, औषध हे अतिशय घरातील विश्वासू व्यक्ती आणि डॉक्टरांच्या समोर दिली जावीत. मनोज जरांगे यांनी स्वतःबद्दल दक्षता आणि काळजी घ्यावी, असा सल्लाही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी जरांगे यांना दिला आहे. (Latest Marathi News)
दरम्यन, मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची आमरण उपोषणामुळे दिवसेंदिवस तब्येत खालवत असल्याने आज मराठा समाज अधिकच आक्रमक झाला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने आज किवळे येथिल मुकाई चौकात रस्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पुणे - मुंबई एक्सप्रेस वे वर जाणारी व वाहन सकल मराठा समाजाच्या बांधवानी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सकल मराठा समाजाच्या जवळपास 50 बांधवांना देहूतरोड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा समाजाच्या वतीने धुळे सोलापूर महामार्गावरील चित्ते पिंपळगाव येथे मागील चार तासापासून मराठा बांधव यांनी रास्ता रोखून धरला होता. महामार्ग रोखून धरल्यामुळे पर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.