केंद्र सरकार नेहमीच नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतात. नागरिकांच्या भविष्यासाठी त्यांना आर्थिक मदत करतात. मुलींसाठी काही वेगळ्या योजना राबवण्यात येतात. मुलींच्या शिक्षणासाठी सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी सरकार स्कॉलरशिप देते. त्यामुळे मुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळते. चला तर मग जाणून घेऊया या योजनांबद्दल
बालिका समृद्धी योजना (Balika Samruddhi Yojana)
केंद्र सरकारने मुलींसाठी बालिका समृद्धी योजना सुरु केली आहे. या योजनेत दारिद्रयरेषेखालील कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर ५०० रुपये दिले जाते. तर शाळेत शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिली जाते. मुलींना उत्तम शिक्षण मिळावे, या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे.
उडान सीबीएसई स्कॉलरशिप प्रोग्राम
उडान स्कॉलरशिप प्रोग्रामअंतर्गत मुलींना अंभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश मिळवून देण्यासाठी मदत केली जाते. अंभियांत्रिकी क्षेत्रात जास्तीत जास्त मुलींनी प्रवेश घ्यावा या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ११वीत शिकणाऱ्या मुलींना मोफत ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने कोचिंग दिले जाते. ६ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मुलींसाठी अभियांत्रिकी शिक्षणामध्ये ३ टक्के जागा राखीव असतात.
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना (Beti Bachao Beti Padhao)
नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ बैटी पढाओ योजना सुरु केली आहे. या योचनेअंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेत मुलींच्या नावाने खाते उघडल्यानंतर मुलींच्या अकाउंटला दर महिन्याला १००० रुपये किंवा वर्षाला १२००० रुपये जमा केले जातात. हे पैसे मुली वयाच्या २१ वर्षानंतर त्यांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी हे पैसे वापरु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.