PM Narendra Modi Speech : मुंबईनजीक ७६००० कोटींच्या प्रकल्पाला मंजूरी, १0 लाख रोजगार निर्मिती होणार!: PM नरेंद्र मोदी

PM Narendra Modi Mumbai Speech : वाढवण बंदराला मंजुरी देण्यात आली आहे. ७६००० कोटींच्या या प्रकल्पातून १० लाख रोजगार निर्मिती होणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत दिली.
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi SpeechSaam Digital
Published On

मुंबईनजीक दोन ते तीन आठवड्यांपूर्वी केंद्र सरकारने वाढवण बंदराला मंजुरी दिली आहे. ७६ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या निर्मितीमुळे १० लाख रोजगार निर्मिती होणार आहे. लाखो तरुणांना रोजगाराची संधी मिळणार असल्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. आज त्यांच्या हस्ते २९ हजार कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

महाराष्ट्रात महायुतीचं सरकार काम करत आहे. महाराष्ट्र सरकारने प्रत्येक वर्षी १० लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला आहे. या प्रशिक्षणादरम्यान शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.कौशल्य विकास प्रशिक्षण ही आपली गरज आहे. गेल्या चार ते पाच वर्षांत कोरोना सारख्या संकटानंतर भारतात रेकॉर्ड ब्रेक रोजगार निर्मिती झाली आहे. आरबीआयच्या रिपोर्टरनुसार देशात ८ कोटी नवे रोजगार मिळाले आहेत.

या आकड्यांमुळे खोटा नरेटीव्ह पसरवणाऱ्यांची बोलती बंद झाली आहे. विरोधक देशाच्या विरोधात आहेत. त्यांची निती विरोधात आहे. पण त्यांची पोलखोल होत आहे,लोक त्यांना नाकारत आहेत. जेव्हा कुठे पूल, रेल्वे ट्रॅक, रस्ता बनतो, तर कुणा ना कुणाला रोजगार मिळतोच. त्यामुळे जसा पायाभूत सुविधांचा वेग वाढतोय, तसे रोजगार देखील वाढत आहेत. येत्या काळात गुंतवणूक वाढीमुळे नव्या संधी निर्माण होणार आहेत.

PM Narendra Modi Speech
PM Modi Mumbai Visit: महाराष्ट्राला जागतिक आर्थिक केंद्र बनवणार! PM नरेंद्र मोदीचं मुंबईबाबतही मोठं विधान, पाहा VIDEO

नव्या सरकारच्या शपथविधीनंतर गरिबांना पक्की घरं देण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत ४ कोटी गरिबांना घरे दिली आहेत. येत्या काळात ३ कोटी लोकांना घरे देणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दलित, गरिब व मागासवर्गीय लोक असतील. शहरांमध्ये राहणाऱ्या गरिब व मध्यमवर्गीय लोकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न आहे.९० लाख फेरीवाल्यांसाठी कर्ज दिलं आहे. त्यातील १३ लाख कर्ज प्रकरणं महाराष्ट्रातील आहेत तर दीड लाख मुंबईतील आहेत.

PM Narendra Modi Speech
Vidhan Sabha Election : विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा झटका; 7 राज्यांमध्ये केवळ २ जागांवर विजय, INDIA आघाडीला किती मिळाल्या जागा?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com