PM Modi Mumbai Visit: महाराष्ट्राला जागतिक आर्थिक केंद्र बनवणार! PM नरेंद्र मोदीचं मुंबईबाबतही मोठं विधान, पाहा VIDEO

PM Modi Mumbai Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतून २९००० हजार कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्राला जागतिक आर्थिक केंद्र बनवण्याचं आश्वासन दिलं
PM Modi Mumbai Visit
PM Modi Mumbai Visit Saam Digital
Published On

महाराष्ट्राजवळ गौरवशाली इतिहास आहे. सशक्त वर्तमान आहे, समृद्ध विकासाचं स्वप्न आहे. तसंच विकसित भारतात मोठा वाटा आहे. त्यामुळे महाराष्ट्राला जागतिक आर्थिक केंद्र बनवणार आहे, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत दिलं. महाराष्ट्रातडे उद्योग, शेती, फायनान्स सेक्टरची पावर आहे. म्हणून मुंबई ही पॉवर हब आहे. मुंबईला जगाचं फिनटेक कॅपिटल करण्याचं माझं स्वप्न असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतून २९००० हजार कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते म्हणाले, आज ३० हजार कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण करण्याची संधी मिळाली आहे. या प्रकल्पातून मुंबईला नजीकच्या भागाशी जोडता येणार आहे. या मार्गात व रेल्वे प्रकल्पांसह महाराष्ट्रातील तरुणांसाठीच्या कौशल्य विकासाची योजना आहे. या योजनेतून महाराष्ट्रात मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होणार आहे.

दोन ते तीन आठवड्यांपूर्वी केंद्र सरकारने वाढवण बंदराला मंजुरी दिली आहे. ७६ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे १० लाख रोजगार निर्मिती होणार आहे. गेल्या एका महिन्यात मुंबई ही देश व विदेशातील गुंतवणूकदारांची साक्षीदार राहिली आहे. आमच्या सरकारच्या तिसऱ्या टर्मचे गुंतवणूकदारांनी स्वागत केले आहे.

PM Modi Mumbai Visit
Vidhan Sabha Election : विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा झटका; 7 राज्यांमध्ये केवळ २ जागांवर विजय, INDIA आघाडीला किती मिळाल्या जागा?

लोकांना माहिती आहे. एनडीए सरकारचं देशात स्थिरता आणू शकतं. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा सांगितलं होतं, तिप्पट वेगाने काम करणार आहे. आज आपण हे होताना पाहत आहोत. छत्रपतींचे किल्ले हे शौर्याचे साक्षीदार आहेत. येथे मेडिकल टुरिझम संधी आहे. महाराष्ट्र हा विकासाची नवी गाथा लिहिणार आहे, आपण याचे सहयात्री आहोत, आजचे प्रकल्प हे त्याचेच प्रतिक असल्याचं मोदी म्हणाले.

अटळ सेतूमुळे 20-25 लाख रुपयांचं इंधन वाचत आहे. पनवेलला जाणाऱ्यांचा वेळ वाचणार आहे. मुंबई वाहतूक व्यवस्था आधुनिक बनवत आहे. 10 वर्षे पूर्वी 8 किमी ही मेट्रो लाईन होती, आता 80 किमी पर्यंत वाढवण्यात आली आहे.तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचे एनडीए सरकारचे प्रयत्न आहेत. पंढरपूर वारीत लाखो वारकरीत भक्तिभावाने सामील झाले आहेत. पुणे ते पंढरपूर हा प्रवास सुकर व्हावााची काळजी सरकार घेत आहे. संत ज्ञानेश्वर व तुकाराम पालखी मार्गाचे काम लवकरच वारकऱ्यांसाठी खुले केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

PM Modi Mumbai Visit
IMD Rain Alert : पालघर, रायगड, ठाण्यात मुसळधार पावसासह ५५ किमी वेगाने वाहणार वारे; समुद्राला भरती, ३.२४ मीटर उंचीच्या उसळणार लाटा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com