Sukanya Samruddhi Yojana: मुलींना वयाच्या २१ व्या वर्षी मिळणार ७१ लाख, काय आहे पोस्ट ऑफिसची योजना? जाणून घ्या...

Sukanya Samruddhi Yojana For Girls: केंद्र सरकारची मुलींसाठी खास योजना आहे. या योजनेत २१ वर्ष पूर्ण झाल्यावर मुलींना ७१ लाख रुपये मिळू शकतात. जाणून घ्या या योजनेबद्दल.
Sukanya Samruddhi Yojana
Sukanya Samruddhi YojanaSaam Tv
Published On

प्रत्येकजण आपल्या मुलांच्या उत्तम भविष्यासाठी सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. मुलींच्या लग्नासाठ, त्यांच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्यी एफडी किंवा योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. मुलींसाठी अशीच एक योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही लखपती होऊ शकतात. या योजनेत भरघोस व्याजदर मिळते.

केंद्र सरकारची ही योजना खास मुलींसाठी आहे. या योजनेत १० वर्षांखालील मुलींच्या नावाने गुंतवणूक करु शकतात. सुकन्या समृद्धी योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेत तुम्हाला वर्षाला कमीत कमीत २५० रुपये जमा करावे लागणार आहे. या योजनेत तुम्ही १.५ लाख रुपयांची गुंतवणूक करु शकतात.

Sukanya Samruddhi Yojana
PM Matru Vandana Scheme: गरोदर महिलांसाठी सरकारची खास योजना! मिळणार ६ हजार रुपयांची मदत; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

सुकन्या समृद्धी योजना ही देशातील सर्वात जास्त व्याजदर देणारी योजना आहे. या योजनेत खातेधारकांना ८.२ टक्के व्याजदर मिळते. जर तुम्ही या योजनेत दरवर्षी काही निश्चित रुपयांची गुंतवणूक केली तर तुमच्या मुलीला ७१ लाख रुपये मिळू शकतात. कसं ते जाणून घ्या.

सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारद्वारे सुरु केली आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या मुलींच्या नावाने गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्ही १५ वर्षापर्यंत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत मुलींचे २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना मॅच्युरिटीचे पैसे मिळतात.

Sukanya Samruddhi Yojana
Free Silai Machine Scheme: खुशखबर! महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन; केंद्र सरकारची खास योजना; अर्जप्रक्रिया जाणून घ्या

कसे मिळणार ७१ लाख रुपये?

जर तुम्ही या योजनेत १५ वर्षांपर्यंत १.४ लाख रुपयांची गुंतवणूक केली.यावर तुम्हाला भरघोस व्याजर मिळणार आहे.या योजनेत तुम्हाला दरवर्षी ५ एप्रिलपूर्वी ही रक्कम जमा करावी लागणार आहे. १५ वर्षांसाठी जर ही रक्कम जमा केल्यास तुम्ही एकूण २२,५०,००० रुपयांची गुंतवँणूक कराल. मॅच्युरिटीनंतर तुम्हाला ७१,८२,११९ रुपये मिळतील. व्याजातून तुम्हाला ४९,३२,११९ रुपये मिळतील. मॅच्युरिटीवर मिळणारी ही रक्कम करमुक्त असेल.

Sukanya Samruddhi Yojana
Lakhpati Didi Scheme: महिलांना व्यवसायासाठी मिळणार 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; लखपती दीदी योजना नक्की आहे तरी काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com