Maharashtra Politics : आमचं सरकार 'लाडकी बहीण योजना' बंद करणार नाही, रोहित पवारांचं आश्वासन

Rohit Pawar On Ladki Bahin Yojana In Solapur : रोहित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केलीय. त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार आल्यास ही योजना बंद करणार नाही, असं सांगितलं आहे.
रोहित पवार
Rohit Pawar On Ladki Bahin Yojana Saam Tv
Published On

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही सोलापूर

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहे. विधानसभेसाठी मोर्चे, सभा, दौरे, आंदोलन आणि भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापूरच्या बार्शीत आज 'शरद पवार यांचा शेतकरी संवाद मेळावा' पार पडत आहे. या मेळाव्यादरम्यान रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय. येत्या काळात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. आमचं सरकार लाडकी बहीण योजना आणि लोकांच्यासाठीच्या योजना बंद करणार नसल्याचं रोहित पवारांनी आज बार्शीत (Rohit Pawar On Ladki Bahin Yojana) म्हटलंय.

रोहित पवार नेमकं काय बोलले?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, असं मुख्यमंत्री म्हणत आहेत. सरकारमध्ये काही लोक गुलाबी रंग घालत आहेत. लाडकी बहीण योजना चुकीची नाहीये, मात्र त्याची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे. एवढी कागदपत्रं कशाला लागतात? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे. महिलांना सरसकट मदत करणे गरजेचं होतं. मात्र, त्यांना (विरोधकांना) हे करायचं नाही. येत्या काळात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. परंतु आमचं सरकार (Vidhan sabha Election) लाडकी बहीण योजना आणि लोकहिताच्या योजना बंद करणार नाही, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केलाय.

विरोधकांवर निशाणा

देवेंद्र फडणवीस यांचा कर्तृत्व काय? असा सवाल देखील रोहित पवार यांनी विचारला आहे. कुटुंब फोडलं तेव्हा आपण शांत बसलात, हेच आहे का आपलं कर्तृत्व, अशी खोचक टीका देखील त्यांनी केलीय. या विधानसभेला लोक तुम्हाला धडा शिकवतील, असा इशारा देखील रोहित पवारांनी विरोधकांना दिलाय. दिल्लीचे बादशाह पवार साहेबांना (Sharad Pawar) भटकती आत्मा म्हटले होते, मात्र महाराष्ट्रातील जनतेचा आत्मा पवार साहेब आहेत अशी परखड टीका देखील रोहित पवार यांनी केलीय.

रोहित पवार
CM Shinde Meet Sharad Pawar: मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांची अर्धा तास बैठक; मराठा आरक्षणाबाबत झाली महत्त्वाची चर्चा

'शेतकरी संवाद मेळावा'

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या (Solapur) बार्शीत आज 'शेतकरी संवाद मेळावा' पार पडला. यावेळी शरद पवार यांच्या हस्ते माढा आणि धाराशिवचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटिल आणि ओमराजे निंबाळकर यांचा सत्कार देखील (Maharashtra Politics) झाला. आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने शरद पवारांचा हा मेळावा आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात बार्शी विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय.

रोहित पवार
Sharad Pawar VIDEO: 'आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा', सोलापूरमध्ये शरद पवारांची गाडी रोखली; मराठा आंदोलक आक्रमक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com