इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL)ने मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी भरती सुरु करण्यात आली आहे. या रिक्त पदांसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. २५ जुलै २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
या नोकरीसाठी इच्छुक उमेदवार sailcareers.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.यासाठी तुम्हाला वेबसाइटवर लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करुन अर्ज करु शकतात.
या भरतीमद्वारे एकूण २४९ मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये केमिकल इंजिनियरसाठी १० पदे, सिव्हिल पदांसाठी २१ पदे, कॉम्प्युटर इंजिनियर पदासाठी ९ पदे, इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी ६१ पदे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरपदासाठी ५ पदे, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरसाठी ११ पदे,मेकॅनिकल पदासाठी ६९ पदे आणि मेटॉल पदासाठी ६३ पदे रिक्त आहेत. या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
या भरतीसाठी तुम्ही फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहेत. सामान्य, ओबीसी, EWS प्रवर्गातील लोकांसाठी ७०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे तर एससी, एसटी प्रवर्गातील लोकांसाठी २०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
या भरतीसाठी उमेदवाराने अंभियांत्रिकी शाखेतील पदवी प्राप्त करणे महत्त्वाचे आहे. यासाठी १८ ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.