Mumbai Airport Job: नोकरी शोधताय? मुंबई विमानतळावर नोकरीची सुवर्णसंधी; माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Mumbai Airport Recruitment: मुंबई एअरपोर्टवर नोकरीची सुवर्णसंधी आहे. १०४९ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा हे जाणून घ्या.
Mumbai Airport Job
Mumbai Airport JobSaam Tv

अनेक तरुणांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. शिक्षण पूर्ण झाले असले तरीही नोकरी मिळत नाही अशा तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. ए आय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथे १०४९ रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह पदासाठी ७०६ जागा रिक्त आहेत. तर सिनियर सर्व्हिस एक्झिक्युटीव्ह या पदासाठी ३४३ जागांवर भरती कपण्यात येणार आहे. ही भरती महिला आणि पुरुष या दोन्ही उमेदवारांसाठी आहे.

Mumbai Airport Job
Job Opportunities: 12 वी उत्तीर्ण जी एन एम नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये नोकरीची मोठी संधी

एअरपोर्टवर नोकरीचा कालावधी तीन वर्षांचा असणार आहे. भारतीय नागरिक असलेले उमेदवारच या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. ही नोकरी कंत्राटी बेसिसवर असणार असून ३ वर्षांचा कालावधी असणार आहे. त्यानंतर उमेदवाराचा कामाचा अनुभव आणि कौशल्य लक्षात घेऊन पुढील कार्यकाळ ठरवला जाईल.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमाल ३३ वर्ष असायला हवे. ओबीसी प्रवर्गातील लोकांना तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे तर एसटी आणि एससी प्रवर्गातील लोकांना ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

Mumbai Airport Job
Post Office Recruitment 2024: 10 वी पास आहात? पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल नोकरी, 35000 पदे, पात्रता, वयोमर्यादा, वाचा डिटेल्स

या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा. त्याला कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव असावा. कॉम्प्युटर वापरायचे ज्ञान असायला हवे. त्याचसोबत इंग्रजी आणि हिंदी भाषेचे ज्ञान असायला हवे. या नोकरीसाठी तुम्हाला २८,६०५ रुपये मासिक वेतन मिळणार आहे. या नोकरीसाठी तु्म्हाला https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScA4WF8Ej8bKu7VwMMOzRhSoYuQSVjD9CFWYZynC_1llrUZVQ/viewform?pli=1 हा गुगल फॉर्म भरावा लागणार आहे.

Mumbai Airport Job
IDBI Bank Jobs 2024 : आयडीबीआय बँकेत तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल १९०००० हजार मिळणार पगार, आजच अप्लाय करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com