Job Opportunities: 12 वी उत्तीर्ण जी एन एम नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये नोकरीची मोठी संधी

Job Opportunities In Germany: आपल्यापैंकी अनेक तरुण आहेत ज्यांना बाहेरील देशात नोकर करण्याची इच्छा असते. तर ही बातमी तुमच्यासाठीच. नक्की नोकरची संधी कोणत्या क्षेत्रात आहे हे एकदा पाहा.
Job Opportunities In Germany
job opportunitiesSaam Tv
Published On

सागर आव्हाड,साम टीव्ही प्रतिनिधी

कोविड काळानंतर जगभरात वैद्यकीय क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली आहे. या सर्व स्थितीमुळे जी एन एम नर्सिंगचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना जर्मनीत नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या. या सर्व प्रकियेची माहिती देण्यासाठी येत्या ७ जुलै रोजी मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनारची माहिती जतन फाउंडेशनचे रवींद्र झेंडे यांनी दिली.

Job Opportunities In Germany
Career Opportunities After 12th: 12वी नंतर पुढे काय करायचं? वाचा करिअरच्या संधी

महाराष्ट्रात(maharashtra) जी एन एम या कोर्सला अनुसूचित जाती जमाती आणि आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. त्यामुळे या कोर्सला या प्रवर्गातून मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतले जातात. या प्रवर्गातील प्रशिक्षित तरुण तरुणींना जर्मनी मध्ये काम मिळवून देण्यासाठी जतन फाऊंडेशन यांनी करार केला असून मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध आहे.

सेमिनार कुठे होणार ?

याचबरोबर कोणत्याही शाखेत १२ वी (12th)उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यासाठी नर्सिंगचा अभ्यासक्रम अप्रेंटिसशीप पद्धतीने कमवा आणि शिका अशा योजनेतही जर्मनीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या महिन्याच्या ७ जुलै रोजी दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत हे सेमिनार पार पडणार असून नवी पेठेतील एम. एम. जोशी फाउंडेशनमध्ये हे सेमिनार होणार आहे. जतन फाऊंडेशन आणि फिनकॉम एड्युव्हेंचर्स यांच्यावतीन या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

जी एन एम , बी एस सी (नर्सिंग), पी बी एस सी , एम एस सी (नर्सिंग),(Nursing) हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. सेमिनार मध्ये जर्मनीमध्ये उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संधी, विसा, परमनंट रेसिडेन्सी , पदव्युत्तर नर्सिंग अभ्यासक्रम आणि जर्मनीतील कामगार कायदे याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

Job Opportunities In Germany
Young Creators New Opportunity : मेटा-करिष्‍मा कपूरचा तरुण क्रिएटर्सना सल्ला! ऑनलाइन गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'ऑन आयजी यू डिसाईड'चा सहयोग

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com