आयुष्याला दुसऱ्यांदा कलाटणी देणारी परीक्षा म्हणजे १२वी. बारावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थी कोणत्या क्षेत्रातून आपल्याला पुढे जायचंय आणि पैसे कमवायचेत हे ठरवतो. आज बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेत नेहमीप्रमाणे यावेळी देखील कोकण विभागाने पहिला क्रमांक मिळवलाय. १२ वीमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर पुढे काय करावं यासाठी अनेक विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो. त्यामुळे आज १२वी नंतरच्या करिअरच्या संधी काय आहेत ते जाणून घेऊ.
आर्ट्समधून १२वी दिली असेल तर तु्म्ही पुढील क्षेत्रात करिअर करू शकता बी.ए. इकोनॉमिक्स, बी. ए. फाइन आर्ट, बी. ए. पॉलिटीकल सायान्स, पत्रकारीता, लिट्रेचर, अॅनिमेशन अशा विविध क्षेत्रात पारंगर होऊन तुम्ही यात काम करून भरपूर पैसे कमवू शकता. किंवा काही महाविद्यालयात या विषयातील शिक्षक म्हणून काम करू शकता.
कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना गणित असतं मात्र त्यांना बारावीला सेक्रेटरीअस प्रॅक्टीस हा विषय देखील ऑप्शनध्ये असतो. आता तुम्हाला १२ वी नंतर कॉमर्समधून करिअरसाठी दोन संधी आहेत. एक म्हणजे गणित विषयासह आणि गणित विषयाशिवाय.
गणित विषयासह तुम्ही पुढे अॅडमिशन घेत असाल तर B. Com in Accounting and Taxation हा पर्याय आहे. यासह Management and International finance, Banking and Finance, Statistics आणि Applied Ecoमध्ये तुम्ही करिअर करू शकता.
Statistics मध्ये Economic Research and Analysis, Applied Economics आणि Data Analysis चा अभ्यास असतो. त्यासह Taxation मध्ये Tax System, Financial Accounting, VAT, Central Tax, Finance, Principles of Management बाबत शिकवले जाते.
Science मध्ये चांगल्या मार्कांनी तुम्ही उत्तीर्ण झाले असाल तर MBBS, बॅचलर ऑफ दंत शस्त्रक्रिया, वैद्यकीय प्रयोगशाळा आणि तंत्रज्ञान (medical lab and technology), पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुपालन (Veterinary science and animal husbandry) फिजिओथेरपी, बायोटेक्नॉलॉजी, B.Sc. फॉरेन्सिकमध्ये तुम्ही पुढचं शिक्षण पूर्ण करू शकता.
या विविध ऑप्शनसह तुम्हाला १२ वीनंतर अभ्यासाची जास्त आवड नसेल तर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट करू शकात, एखाद्या कलेत पारंगत होऊ शकता. जसे की, शिवणकाम, जेवण, कराटे, स्विमिंग अशा विविध गोष्टींत तुम्ही पारंगत झाल्यानंतर याचे क्लासेस घेऊन तुम्ही स्वत:चा व्यावसाय सुरू करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.