Exam Center
Exam CenterSaam TV

Exam Center: १०वी आणि १२वी परीक्षा केंद्र असलेल्या शाळांसाठी मोठी बातमी; या नियमांचं पालन न केल्यास अनुदान थांबणार

10th 12th Exam Center: यंदा विभागातील दहावीला सुमारे १ लाख ८६ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. तर बारावीला १ लाख ७६ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. शिवाय प्रॅक्टिकल परीक्षेचे मार्क ऑनलाईन पद्धतीने
Published on

Education News:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होण्याआधीच विभागीय मंडळांने शाळांना इशारा दिलाय. काही ठिकाणी पुरेशा सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना बाकाऐवजी जमिनीवर बसविले जाते. परंतु तसे आढळून आल्यास त्या शाळेचे वेतन अनुदान थांबविण्यात येईल, असा इशारा विभागीय मंडळाच्या वतीने शाळांना दिलाय.

Exam Center
Heart Attack Video: वर्गात बसल्या बसल्या कोसळला, १८ वर्षाच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू; थरारक VIDEO

यंदा विभागातील दहावीला सुमारे १ लाख ८६ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. तर बारावीला १ लाख ७६ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. शिवाय प्रॅक्टिकल परीक्षेचे मार्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्यात. दहावी किंवा बारावीचं वर्ष म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष असतं. अशात काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थांची मोठी गैरसोय होते.

या आधी काही विद्यार्थ्यांना परीक्षेला शाळेत बसण्यासाठी बाकांची व्यवस्था नसल्याने खाली बसावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. खाली बसणे, किंवा परीक्षा केंद्रावर पाणी आणि शौच्छालयाची योग्य सोय नसणे अशा समस्यांमुळे विद्यार्थांना पेपर देताना अडथळे येतात. त्याचा थेट परीणाम त्यांच्या परीक्षेवर होतो. परिणामी डिस्टर्ब झाल्याने जास्त अभ्यास करूनही काही विद्यार्थांना समाधानकारवर पेपर लिहिता येत नाही.

विद्यार्थ्यांची होणारी गौरसोय लक्षात घेता विभागीय मंडळांने शाळांना याबाबत इशारा दिलाय. कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यांची अशी गैरसोय होत असल्याचे आढळून आल्यास तात्काळ संबंधित शाळेचे वेतन अनुदान थांबविण्यात येणार आहे.

Exam Center
Mumbai Crime News: बालपणीची मैत्री, प्रेम अन् मृत्यू… झाडाच्या नंबरवरून 35 दिवसांनंतर हत्येचं गूढ कसं उलघडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com