Bank Of Baroda Recruitment: तरुणांनो बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न होणार पूर्ण; बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती

Bank Of Baroda Recruitment 2024: बँकेत काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विविध जागांसाठी भरती सुरु आहे.
Bank of Baroda
Bank of Baroda yandex

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये व्यवस्थापक, UI/UX डिझाइनरसह विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच २ जुलै आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

या भरतीसाठी उमेदवारांनी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरु शकता.त्यासाठी तुम्हाला bankodbaroda.in वर जाऊन फॉर्म भरावा लागेल.

Bank of Baroda
Post Office Recruitment: पोस्ट ऑफिसमध्ये ३५ हजार पदांसाठी भरती; १० वी पास उमेदवार करु शकणार अर्ज; जाणून घ्या सविस्तर

यासाठी अर्ज करताना तुम्हाला सर्वप्रथम bankodbaroda.in या वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर होमपेजवर करिअर या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या योग्यतेच्या पदासाठी नोकरी असलेल्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर अप्लाय ऑनलाइनवर क्लिक करा. यानंतर तुमची माहिती भरुन फॉर्म भरा. या फॉर्मची प्रिंट तुम्ही तुमच्याजवळ जपून ठेवा.

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य, ओबीसी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS)श्रेणीतील लोकांना ६०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC/ST/PWD आणि महिला उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल. तुम्ही अधिक माहितीसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Bank of Baroda
Zilla Parishad Job: तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, जिल्हा परिषदेत बंपर भरती; आजच करा अर्ज

जर तुमचे बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर बँक ऑफ बडोदासोबतच अनेक बँकामध्ये नोकरीसाठी अर्ज करु शकतात. सध्या पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची संधी उपलब्ध आहे. त्याचसोबत तुम्ही आयबीपीएस लिपीकची परीक्षा देऊ शकतात. यामुळे तुम्हाला सरकारी बँकेत नोकरीची संधी मिळेल.

Bank of Baroda
Bombay High Court Job: मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांची भरती, तब्बल ५७ हजार मिळणार पगार, शिक्षणाची अट काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com