Post Office Recruitment: पोस्ट ऑफिसमध्ये ३५ हजार पदांसाठी भरती; १० वी पास उमेदवार करु शकणार अर्ज; जाणून घ्या सविस्तर

Post Office Recruitment 2024: पोस्ट ऑफिसमध्ये मोठी भरती जाहीर केली आहे. ३५ हजारहून अधिक जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. जीडीएस पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
Post Office Recruitment
Post Office RecruitmentGoogle
Published On

भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे.ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. जवळपास ३५००० पदांसाठी रिक्त जागा आहेत. या भरतीसाठी अर्जाची सुरुवात १५ जुलैपासून सुरु होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवार indiapostgdsonline.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात.

Post Office Recruitment
Government Job: परीक्षा न देताच सरकारी नोकरी; पगार १ लाख ४० हजार; कुठे,कसा अर्ज कराल? वाचा

भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये ३५ हजार ग्रामीण डाक सेवकांची भरती केली जाणार आहे. यासाठी जाहिरात प्रदर्शित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दहावीच्या परीक्षेत त्यांना मातृभाषेतील एक विषय असणे आवश्यक आहे. याशिवाय अर्जदारांना कॉम्प्युटर आणि सायकल चालवण्याचे ज्ञान असावे.

ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष ते ४० वर्ष असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सुट दिली जाईल. यामध्ये तुमच्या गुणांच्या आधारे निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी वेबसाइटवर जाहीर केली जाईल.

Post Office Recruitment
Punjab National Bank Recruitment: तरुणांसाठी सुवर्णसंधी! पंजाब नॅशनल बँकेत २७०० शिकाऊ पदांसाठी भरती; अशा प्रकारे करा अर्ज

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य, ओबीसी आणि EWS गटातील लोकांना १०० रुपये शुल्क द्यावे लागतात. तर अनुसूचित जाती आणि PWD प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.

Post Office Recruitment
Police Recruitment : पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं; जळगावहून नवी मुंबईत भरतीला आलेल्या तरुणाचा उपाचारादरम्यान मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com